टीम हॅलो महाराष्ट्र | तुम्ही दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. सगळ्यांचं मनापासून धन्यवाद..!! आता मी सुरक्षित असून परत आले आहे. नवीन लढ्यासाठी पुन्हा सज्ज होऊन..!! या लढ्यात आता एक इंचभरही मागे हटणार असं मत जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेची प्रमुख आयशे घोष हिने व्यक्त केलं आहे.
जवाहरलाल नेहरु विद्यापीठात गुंडांकडून विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्यात आयशे घोष ही गंभीर जखमी झाली होती. तिच्या डोक्याला झालेल्या गंभीर दुखपतीचे फोटोही व्हायरल झाला होता. डाव्या संघटनांना लक्ष्य करताना विद्यार्थ्यांवर हल्ला करण्यासाठी ५० हुन अधिक लोकांचा समुदाय विद्यापीठात आला होता. यानंतर उशिरा जागे झालेल्या पोलिसांनी या गुंडांना बाहेर काढून परिस्थिती नियंत्रणात आणली. दरम्यान, या घटनेचे संतप्त पडसाद देशभर उमटले असून अनेक ठिकाणी मोर्चे आणि आंदोलन झाल्याचं चित्र दिवसभरात पहायला मिळालं.