JNU प्रकरण : दिल्ली पोलिसांची कमाल, सर्व्हर रूममध्ये तोडफोड होण्याआधीच FIR दाखल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : जेएनयू हिंसाचार प्रकरणात एक नवीन खुलासा समोर आला आहे. आरटीआयमध्ये मिळालेल्या माहितीत असे आढळले आहे की. दिल्ली पोलिसांनी घटना घडायच्या आधीच FIR नोंदवला आहे. या अहवालानुसार दिल्ली पोलिसांनी जेएनयू सर्व्हर रूममध्ये दोन एफआयआर नोंदवले आहेत. त्यानुसार 1 जानेवारी आणि 4 जानेवारीला सर्व्हर रूमला लक्ष्य केले गेले. परंतु आरटीआय अंतर्गत मिळालेल्या माहितीत … Read more

‘तुकडे-तुकडे गँग’ आम्हाला माहितीचं नाही; आरटीआय अर्जाला गृहमंत्रालयाचे उत्तर

२०१६ साली जवाहरलाल नेहरु विद्यापिठामध्ये देशविरोधी नारे लावण्याचा कथित व्हिडिओ समोर आल्यानंतर भाजप नेत्यांनी तेथील विद्यार्थ्यांचा तुकडे-तुकडे गॅंग असा उल्लेख करायला सुरुवात केली. भाजपच्या प्रत्येक प्रचारसभेत जेएनयुतील त्या कथित घटनेचा उल्लेख करत येथील विद्यार्थ्यांची तुकडे-तुकडे गँग कशी देशविरोधी हे ठसवण्याचा प्रयन्त भाजपचे शीर्ष नेते नेहमीच करताना दिसतात. मात्र, याच तुकडे-तुकडे गॅंगच्या अस्तित्वाबद्दल सरकारने घुमजाव केला केला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाकडे देशातील ‘तुकडे-तुकडे गँग’बद्दल कोणतीही माहिती नाही, असं स्पष्टीकरण आरटीआय अर्जाला उत्तर देताना सरकारने दिले आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते संकेत गोखले यांनी सोमवारी यासंदर्भातील माहिती दिली.

हिंसाचाराचा कट २८ ऑक्टोबरलाच रचला गेला : अभाविप

जेएनयू हिंसाचाराबाबत आज सोमवारी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने पत्रकार परिषद घेतली. व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप आणि व्हायरल झालेल्या चॅटची चौकशी झाली पाहिजे. ते म्हणाले की त्या ग्रुपची सर्व संख्या तपासली पाहिजेत जेणेकरुन त्याची सत्यता कळू शकेल.

जेएनयूचे विद्यार्थी आंदोलनासोबत अभ्यासातही हुशार; IES परीक्षेच्या गुणवत्ता यादीत १८ ‘जेएनयू’कर

२०१९ मध्ये घेतलेल्या या परीक्षेत पूर्ण भारतातून फक्त ३२ विद्यार्थी निवडले जाणार होते. यातील १८ जागांवर जेएनयुने आपली छाप पाडली आहे.

केरळच्या मुख्यमंत्र्यानी दिल्लीमध्ये घेतली आयेशी घोषची भेट

केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी शनिवारी जेएनयू विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षा आयेशी घोष हीची भेट घेतली आणि म्हणाले की विद्यापीठातील फी वाढ आणि नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात संपूर्ण देश त्यांच्या पाठीशी उभा आहे. विजयन यांनी आयेशीची दिल्लीतल्या केरळ भवनामध्ये भेट घेतली, आयेशीची भेट घेऊन तिला सुधन्वा देशपांडे यांचे ‘हल्ला बोल: द डेथ अँड लाइफ ऑफ सफदर हाश्मी’ हे पुस्तक भेटवस्तू म्हणून दिली. विशेष म्हणजे, मुखवटा घातलेल्या हल्लेखोरांच्या एका गटाने विद्यापीठ परिसरात घुसून विद्यार्थ्यांवर हल्ला केला, त्या दरम्यान आयेशीच्या डोक्याला जबर मार लागला होता. आयेशीला तिच्या आणि जखमी झालेल्या इतर विद्यार्थ्यांच्या प्रकृतीविषयी विचारले असता, विजयन म्हणाले, “न्यायाच्या लढाईत संपूर्ण देश जेएनयूएसयू सोबत आहे. तुमच्या आंदोलनाबद्दल सर्वांना माहिती आहे आणि तुम्हाला काय झाले आहे हे देखील सर्वांना माहीत आहे.” सीपीआयच्या ज्येष्ठ नेत्याने फेसबुक पोस्टमध्ये लिहिले की जेएनयूचे विद्यार्थी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरोधात मोठी लढाई लढत आहेत. विजयन म्हणाले, “आयेशी घोष जखमी असूनदेखील लढाईचे नेतृत्व करत आहे.”

‘यूनिटी अगेन्स्ट लेफ्ट व्हाॅट्सॅप ग्रुपच्या सदस्यांची ओळख पटली, १० लोक कॅम्पसच्या बाहेरचे’

जेएनयू हिंसाचार प्रकरणी दिल्ली पोलिस गुन्हे शाखेच्या SIT ने ‘यूनिटी अगेन्स्ट लेफ्ट’ नावाच्या व्हाॅट्सॅप ग्रुपच्या सदस्यांना ओळखलं आहे. या ग्रुपमध्ये एकूण ६० सदस्य होते. त्यापैकी ३७ लोकांना पोलिसांना ओळखण्यात यश आलं आहे. एका वृत्तवाहिनीच्या सूत्रानुसार त्यातले १० लोक कॅम्पसच्या बाहेरचे होते. म्हणजे हिंसेमध्ये सामील असणारे हे १० लोक, त्यांचा कॅम्पसशी कुठलाच संबंध नाही. डाव्या आणि उजव्या अशा दोन्ही गटांनी हिंसाचारात बाहेरच्या लोकांची मदत घेतली.

कन्हैय्याचा दिल्ली पोलिसांवर पक्षपाताचा आरोप

“दिल्ली पोलिसांनी जी पत्रकार परिषद घेतली ती दिल्ली पोलिसांची पत्रकार परिषद वाटतच नव्हती, ती अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची पत्रकार परिषद वाटतच होती.” असा घणाघाती आरोप जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या माजी विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैय्या कुमारने दिल्ली पोलिसांवर केला.

दीपिकाचा ‘छपाक’ मध्यप्रदेशमध्ये टॅक्स फ्री

इंदौर : अभिनेत्री दीपिका पदुकोणचा बहुचर्चित ‘छपाक’ चित्रपट मध्यप्रदेश राज्यामध्ये टॅक्स फ्री करण्यात आला आहे. मध्यप्रदेशच्या सरकारने हा निर्णय घेतला आहे. छपाक हा चित्रपट उद्या १० जानेवारी रोजी देशभर प्रदर्शित होणार आहे. मध्यप्रदेशमध्ये सध्या काँग्रेसचे सरकार असून मुख्यमंत्री कमलनाथ यांनी हा निर्णय घेतला आहे. छपाक हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित असून तरुणीवर झालेल्या ऍसिड हल्ल्याविषयी … Read more

सरकारच्या दमनशाहीला गांधीजींच्या अहिंसेने उत्तर द्यायला हवे – शरद पवार

मुंबई । जेएनयूमध्ये जे घडले ते योग्य नव्हते, म्हणून त्याचा सर्वत्र विरोध होत आहे. लोक सरकारवर संतप्त आहेत म्हणून देशात ठिकठिकाणी आंदोलने होत आहेत. सरकारी दडपशाहीला गांधीजींच्या अहिंसेने उत्तर द्यायला हवे आहे. असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले. मुंबई येथे आज शरद पवार, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आदी … Read more

‘या’ कारणामुळं दीपिका निर्भयाच्या पालकांना भेटण्याऐवजी जेएनयूत गेली; विवेक अग्निहोत्रीने केला गौप्यस्फोट

दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीने दीपिकाच्या जेएनयु भेटीबाबत आता गौप्यस्फोट करत ट्विटरवर एक अजब दावा केला आहे.फॉक्सस्टार स्टुडिओ निर्मित दीपिकाचा छपाक हा चित्रपट येत्या १० तारखेला प्रदर्शित होत आहे. अग्निहोत्री ह्यांचा म्हणण्यानुसार .फॉक्सस्टार स्टुडिओ मधील एका आतल्या माणसाचा त्यांना फोन आलेला होता. त्यांच्याशी बोलतांना जेएनयुमधील तुकडे-तुकडे गॅंगबद्दल त्यांना काहीच माहित नसल्याचे मला आश्चर्य वाटलं. दीपिकाच्या जेएनयुत ज्याण्याने ते मला विचारात होते कि जर हा सिनेमा यामुळं पडला तर याला जबाबदार कोण असणार? कारण दीपिकाला तर तिचा व्यवसायिक निधी मिळालेला आहे