मी गांधी कुटुंबाविरोधात नाही, केवळ काँग्रेस कार्यकर्त्यांचा आवाज पोहचवतो आहे – कपिल सिब्बल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बिहार निवडणुकीत राजद आणि काँग्रेसच्या नेतृत्वातील महागठबंधनचा पराभव झाला. यात काँग्रेसचा पराभव चांगलाच मानहानिकारक होता. यावर केवळ इतर पक्षांनीच नाही तर अगदी काँग्रेसमधील नेत्यांनीही टीका केली. यात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल आघाडीवर आहेत. त्यांनी काँग्रेसला आत्मपरिक्षणाची गरज असल्याचं मत व्यक्त केलं. यावर काँग्रेसमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला. आता सिब्बल यांनी आपल्या भूमिकेवर स्पष्टीकरण दिलंय. आपण गांधी कुटुंबीयांविरोधात नसल्याची प्रतिक्रिया सिब्बल यांनी दिली. इंडिया टुडेनं साधलेल्या विशेष संवादादरम्यान त्यांनी यावर भाष्य केलं.

“प्रश्न हा आहे की राहुल गांधी यांनी दीड वर्षांपूर्वी आपल्याला काँग्रेसच्या अध्यक्षपदी राहायचं नसल्याचं स्पष्ट केलं होतं. तसंच त्या पदी गांधी कुटुंबातील कोणतीही व्यक्ती असू नये असंही ते म्हणाले होते. या गोष्टीला दीड वर्ष उलटल्यानंतरही मी हे विचारू इच्छितो की कोणताही राष्ट्रीय पक्ष विना अध्यक्ष एवढ्या मोठ्या कालावधीसाठी काम कसा करू शकतो. मी पक्षाच्या आत यावर आवाज उचलला होता. आम्ही ऑगस्ट महिन्यात पत्रही लिहिलं होतं. परंतु आमच्याशी कोणीही चर्चा केली नाही. दीड वर्षांनंतरही आमच्या पक्षाला अध्यक्ष नाही. कार्यकर्त्यांनी आपल्या समस्या कोणाकडे मांडाव्या?,” असा सवाल सिब्बल यांनी केला.

एका राष्ट्रीय पक्षासाठी आणि तेही जेव्हा हा पक्ष सर्वात जुना असेल तेव्हा ही अशी परिस्थिती पक्षासाठी कठीण आहे. मला कुणाच्याही क्षमतांवर प्रश्न उपस्थित करायचे नाही. पक्षाच्या घटनेनुसार अध्यक्षपदाची निवडणूक व्हावी असं मी म्हणत आहे. जर आपण आपल्या पक्षातच निवडणूक घेतली नाही, तर आपल्याला हवा तो निकाल कसा येणार? हीच गोष्ट आम्ही आमच्या चिट्ठीत लिहिली होती.” असेही कपिल सिब्बल म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment