मी जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थी असल्याचा अभिमान : जिल्हाधिकारी अमोल येडगे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड | शिक्षण कोणत्या ठिकाणी घेतो, त्यापेक्षा कशा प्रकारे घेतो हे महत्वाचे आहे. जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षण घेऊनही अनेक लोक विद्याविभूषित झालेले आहेत, देशसेवा करत आहेत. मी ही जिल्हा परिषद शाळेचा माजी विद्यार्थी आहे. ग्रामस्थांच्या प्रेमामुळे व आई-वडील, चुलते यांच्या संस्कारामुळे मी आज जिल्हाधिकारी म्हणून तुमच्या समोर उभा आहे. तरीही, माझे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळेतून झाले आहे. गावातील ग्रामस्थांनी आपल्या पाल्यावर चांगले संस्कार करून आदर्श नागरिक घडवण्यासाठी प्रयत्न करावेत. आज लोकार्पण होत असलेल्या शाळेमधून अनेक विद्याविभूषित नागरिक उदयास यावेत. केवळ शिक्षणामुळेच जीवन समृद्ध होते. मी आबईचीवाडी जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थी असून मला गावाचा, शाळेचा अभिमान असल्याचे गाैरवोद्गार जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी काढले.

आबईचीवाडी (ता. कराड) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या नूतन इमारतीचा लोकार्पण सोहळा आबईचीवाडी गावचे सुपुत्र व यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या शुभहस्ते आणि एम्‍पथी फाउंडेशन मुंबईचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. आर. सुंदरेश्वरम यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी महाराष्ट्र राज्य शिक्षण संचालक महेश पालकर, एम. आर. सुंदरेश्वरम, डॉ. दिनशॉव हॉरमुझडी, कराडचे तहसीलदार विजय पवार, शिक्षणाधिकारी शबनम मुजावर, दिनेश झोरे, गटविकास अधिकारी मीना साळुंखे, गटशिक्षणाधिकारी सन्मती देशमाने, विस्तार अधिकारी जमीला मुजावर, अरुण यादव, विस्तार अधिकारी बिट सुपने रमेश कांबळे, निवास पवार, संतोष कांबळे, सरपंच सौ. अंकिता सुर्वे, उपसरपंच अशोक माने, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सदाशिव जाधव, उपाध्यक्षा पूनम नांगरे, सोसायटीचे चेअरमन दशरथ येडगे, तंटामुक्ती अध्यक्ष अंकुश काटकर, मुख्याध्यापक उत्तम जांभळे, जगन्नाथ येडगे, रघुनाथ येडगे, संपत सुर्वे, संभाजी सुर्वे, तात्यासो सुर्वे, तानाजी सुर्वे (फौजी), उपशिक्षिका योगिता कणसे, दीपाली पाटील, निलम शिर्के तसेच  सुपने, वसंतगड, विजयनगर, पश्चिम सुपने येथील ग्रामस्थ, विद्यार्थी व शिक्षक वृंद उपस्थित होते.

श्री अमोल येडगे पुढे म्हणाले, मी जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये एम्‍पथी फाउंडेशनने 50 हून अधिक गावांमध्ये शाळा खोल्या इमारती बांधून त्यांचे लोकार्पण केले आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये या संस्थेचे भरीव योगदान आहे.  माझ्या विनंतीवरून क्षणाचाही विलंब न लावता आपल्या गावासाठी शाळा इमारत बांधून दिली आहे.  त्यासाठी एम्‍पथी फाउंडेशन मुंबईचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम.आर. सुंदरेश्वरम यांचे विशेष आभार मानले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दादासो माने यांनी केले. आभार उत्तम जांभळे यांनी मानले.