पटोले काय बोलतील हे सांगू शकत नाही परंतु आमच्यात शिवसेनाप्रमुखच निर्णय घेतात : शंभूराज देसाई

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी : शुभम बोडके

राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला असताना महाविकास आघाडीतील नेत्यांकडून स्वबळावर निवडणूक लढविनार असल्याचे सूतोवाच दिले जात आहेत. एकीकडे शिवसेनेचे खासदार संजय राऊत राज्यात पुढील पाच वर्षे शिवसेनेचाच मुख्यमंत्री असणार असल्याचे सांगत आहेत. तर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळावर यापुढील निडणूक लढवणार असल्याचे सांगितले आहे. पटोले यांनी केलेल्या विधानाबद्दल आमदार शंभूराज देसाई म्हणाले कि, “पटोले काय बोलतील हे सांगू शकत नाही. त्यांच्या पक्षाचे धोरण हे त्यांचे प्रदेशाध्यक्ष मांडतील. परंतु आमच्या पक्षात शिवसेनाप्रमुख निर्णय घेतात. आणि ते जे सांगतील तेच आम्ही करीत असतो.”

राज्यात महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांकडून सध्या पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्न केली जात आहेत. प्रत्येक आमदार, खासदार आपापल्या जिल्ह्यात आपली पक्ष संघटना वाढविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. सातारा जिल्ह्यातहि अशीच परिस्थिती आहे. सध्या राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेस आगामी निवडणूक स्वबळावर लढविणार असल्याच्या केलेल्या विधानानंतर आघाडी सरकारमधील शिवसेनेतील इतर नेत्यांकडून प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. पटोले यांच्या विधानाबाबत गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी माध्यमप्रतिनिधींशी संवाद साधत प्रतिक्रिया दिली.

यावेळी खासदार संजय राऊत तसेच नाना पटोले यांनी स्वबळावर यापुढील निवडणुका लढवण्याचा वक्तव्यावर माध्यम प्रतिनिधींनी विचारले असता गृहराज्यमंत्री देसाई म्हणाले, “आमच्या पक्षांमध्ये निवडणुका कशा लढवायच्या याचा निर्णय घेण्याचा अधिकार शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनाच आहे. ते जे निर्णय घेतील त्याच निर्णयावरच शिवसेना काम करेल. जशा पद्धतीने निवडणूक लढा म्हणतील त्या पद्धतीने आमची सर्वांची लढण्याची तयारी आहे. नाना पटोले यांनी केलेल्या विधानाबाबत सांगायचे झाले तर पटोले काय बोलतील हे सांगू शकत नाही. त्यांच्या पक्षाचे धोरण हे त्यांचे प्रदेशाध्यक्ष मांडतील परंतु आमच्या पक्षात जे शिवसेनाप्रमुख सांगतील तेच आम्ही करत असतो.

Leave a Comment