बैल मुततो तशा मी भूमिका बदलत नाही, चंद्रकांतदादांना क्लिप पाठवल्याच नाही- राज ठाकरे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात मनसे- भाजप युतीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी परप्रांतीयांच्या भूमिके बद्दलची क्लिप भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना पाठवले असल्याची माहिती समोर येत होती. परंतु राज ठाकरे यांनी हा दावा फेटाळला असून आपण चंद्रकांत पाटलांना क्लिप पाठवल्याच नाही असे स्पष्ट केले.

बैल मुततो तशा मी भूमिका बदलत नाही. मी चंद्रकांत पाटील यांना क्लिप पाठवली नाही. मी बोललो होतो क्लिप पाठवेल पण त्यांना कोणी पाठवल्या माहीत नाही असे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले. तसेच चंद्रकांत पाटील यांना त्या क्लिप कोणी पाठवल्या हे सुद्धा मी विचारणार आहे असं राज ठाकरे यांनी म्हंटल.

माझ्या भूमिका क्लिअर आहेत. माझ्या भूमिका आजपर्यंत मांडल्या त्या अत्यंत स्पष्ट आहेत. त्या देश हिताच्या आहेत आणि महाराष्ट्र हिताच्या आहेत. माझ्या भाषणात बैल मुतल्यासारखा मी विचार नाही करत असे राज ठाकरे यांनी सांगितले.

Leave a Comment