माझ्या विश्वासार्हतेवर परिणाम झाला तरी मला फरक पडत नाही – अण्णा हजारे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अहमदनगर | जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केंद्र सरकारच्या विरोधात आपण शनिवार पासून उपोषण सुरु करणार आहोत असे जाहीर केले होते. मात्र उपोषण सुरु करण्यापुर्वीच हजारे यांनी शुक्रवारी आपले उपोषण मागे घेतले. भाजप नेत्यांच्या शिष्टाईनंतर हजारे यांनी उपोषण मागे घेतल्याने आपल्या विश्वासार्हतेवर परिणाम होईल असे आपल्याला वाटत नाही का असे विचारले असता हजारे यांनी माझ्या विश्वासार्हतेवर परिणाम झाला तरी मला फरक पडत नाही असे म्हटले आहे.

कोणी कोणत्या चष्म्यातून पाहायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. एखाद्याचा पाहण्याचा चष्माच वाईट असेल तर त्याला आपण काय करणार असे मत हजारे यांनी व्यक्त केले आहे. केंद्र सरकारने दिलेल्या आश्वासनांवर आपल्याला पुर्ण विश्वास असून त्यामुळे आपण उपोषण मागे घेत आहोत असं हजारे यांनी सांगितले आहे.

दरम्यान, सध्या दिल्ली येथे शेतकरी आंदोलन एका महत्वाच्या टप्प्यावर आहे. अशात अण्णा हजारे यांनीही आपण सरकारविरोधात उपोषणाला बसणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र उपोषणाला बसण्यापूर्वीच हजारे यांनी शुक्रवारी संध्याकाळी उपोषण मागे घेत असल्याचे जाहीर केले. भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय राज्यकृषीमंत्री यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर हजारे यांनी आपले उपोषण मागे घेतले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment