धोनीची जागा मी कधीच घेऊ शकत नाही – हार्दिक पांड्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम हॅलो महाराष्ट्र । ”धोनीची जागा मी कधीच घेऊ शकत नाही, त्यामुळे मी आता त्याचा विचार करत नाही. मी सध्या न्यूझीलंड दौऱ्यासाठीच्या आव्हानासाठी सज्ज आहे. मी जे काही करेन ते माझ्या संघाच्या भल्यासाठी असेल यात काही शंकाच नाही” असं मत टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना व्यक्त केलं.

गेले काही महिने आपल्या पाठीच्या दुखापतीमुळे संघाबाहेर असलेला अष्टपैलू हार्दिक पांड्या अखेरीस क्रिकेटमध्ये पुनरागमनासाठी सज्ज झाला आहे. भारत अ संघाच्या न्यूझीलंड दौऱ्यात पांड्याला संधी देण्यात आलेली आहे. आगामी न्यूझीलंड दौरा आणि टी-२० विश्वचषकाच्या दृष्टीकोनातून पांड्याचं तंदुरुस्त राहणं भारतीय संघासाठी महत्वाचं आहे. महेंद्रसिंह धोनीच्या अनुपस्थितीत हार्दिकने फिनीशरची भूमिका बजावी अशी अपेक्षा होत आहे, मात्र आपण धोनीची जागा कधीच घेऊ शकत नाही असं पांड्याने स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, वर्षाअखेरीस होणाऱ्या या विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाला सरावासाठी फार कमी सामने मिळतील, त्यामुळे संघाची बांधणी करणं हे विराट आणि रवी शास्त्रींसमोरचं मोठं आव्हान असेल. त्यामुळं एक-एक पाऊल सांभाळत आम्ही टाकत गेलो, तरऑस्ट्रेलियात विश्वचषक जिंकण्यापासून आम्हाला कोणीही थांबवू शकणार नाही असं पांड्या मुलाखतीत बोलत होता.

महाराष्ट्रच्या कानाकोपर्‍यातील ब्रेकिंग बातम्या थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 8080944419 या नंबरवर WhatsApp करा आणि लिहा Hello News

Leave a Comment