मी गर्दी जमा करणार होतोच, पोलसांनी माझ्यावर कारवाई करावी : खासदार जलील

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद । मी गर्दी जमा करणार होतोच, आणि लाखोंच्या संख्येने करणार होतो. मी जाहीर सांगितलेले गर्दी जमा करणार. पोलिसांना माहिती होती, कारण जे लोक त्रस्त झाले आहेत. लोकांनी कोण बोलवतंय ते नाही बघितलं, त्यांनी उद्धेश काय आहे, ते बघितलं. काल माज्या घरासमोर मी गर्दी केली नव्हती. तर लोक धन्यवाद, आशीर्वाद द्यायला आले होते. परंतु मी स्वतः मानतो माझ्याकडून चूक झाली आहे. पोलसांनी जी सामान्य लोकांवर जी कारवाई केली असती ती कारवाई माझ्यावर करावी. मी खासदार आहे म्हणजे माझ्यासाठी वेगळा कायदा नाही, असे सांगत गुन्हा दाखल होताच खासदार इम्तियाज जलील यांनी मान्य केली चूक मान्य केली.

मंगळवारी रात्री जिल्हाधिका-यांनी पत्रकार परिषद घेत औरंगाबाद मधील लागू होणारा लॉकडाऊन रद्द करण्यात आल्याची घोषणा केली होती. या घोषणेनंतर रात्रीची संचारबंदी झुगारात खासदार इम्तियाज जलील यांनी त्यांच्या निवासस्थानाबाहेर शेकडोच्या गर्दीत लॉकडाऊन रद्द झाल्याचा जल्लोष करण्यात आला होता. त्यानंतर शहरातील वातावरण चांगलेच तापले होते. सर्वच राजकीय पक्षांनी जलील यांच्यासह समर्थकांवर कारवाईची मागणी करून प्रशासनाला धारेवर धरले होते.

त्या पार्श्वभूमीवरच बुधवारी सिटीचौक पोलीस ठाण्यात खासदार जलील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर त्यांनी चूक मान्य केली. ते नेमकं काय म्हणाले पाहुयात…..

https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/759696578307108

औरंगाबाद जिल्ह्यात लॉकडाऊन लागल्यापासून ते रद्द करण्यापर्यंत अनेक राजकीय नेत्यांनी एकमेकावर टीकाटिप्पणी झाली. त्याचबरोबर लॉकडाऊन रद्द नंतरही खासदार इम्तियाज जलील यांच्या समर्थकांनी कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर नियमाचे उल्लंघन करत जल्लोष केला. तेव्हा खासदार व त्यांच्या कार्यकर्त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी या पार्श्वभूमीवर सध्या खासदार इम्तियाज जलील यांनी दिलेल्या प्रतिक्रिया नंतर शांत होईल, अशी अपेक्षा आता होत आहे.

 

Leave a Comment