मला पाहुणा म्हणून बोलवण्यात आलं होतं; आर्यन खानची माहिती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अमली पदार्थ विरोधी पथकाने (एनसीबी) मुंबईत मोठी कारवाई केली आहे. मुंबईच्या समुद्रात क्रूझवर सुरु असलेल्या एका रेव्ह पार्टीवर धाड टाकत एनसीबीने आठ जणांना ताब्यात घेतलं आहे. यामध्ये प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यनचा देखील समावेश असून त्याची एनसीबी कडून कसून चौकशी सुरू आहे.

क्रूझवरील पार्टीमध्ये मला पाहुणा म्हणून बोलावण्यात आलं होतं. असे आर्यन म्हणाला. पार्टीत जाण्यासाठी त्याला कोणतेही पैसे भरावे लागले नव्हते. चौकशीदरम्यान आर्यन खानने कार्यक्रमाच्या आयोजकांना आपल्या नावाचा वापर करत इतरांना आमंत्रण दिलं असा दावा केला आहे.

दरम्यान, समीर वानखेडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, एकूण आठ जणांची चौकशी केली जात आहे. “आर्यन खान, अरबाज मर्चंट, मुनमून धमेचा, नुपूर सारिका, इस्मीत सिंग, मोहक जसवाल, विक्रम छोकेर, गोमित चोप्रा यांची क्रूझ पार्टी रेव्ह प्रकरणी सध्या चौकशी सुरु आहे,” अशी माहिती समीर वानखेडे यांनी दिली आहे. अरबाज मर्चंट हा शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचा जवळचा मित्र आहे.