शिवेंद्रराजे यांना भेटणारच, भेटले नाही तर गाठणारच : छ. उदयनराजे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा | जिल्ह्यातील नेत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी सदिच्छा भेटी घेतल्या आहेत. सध्या शिवेंद्रराजे पुण्याला गेल्याचे समजले. शिवेंद्रसिंहराजे यांना तर भेटणारच आणि भेटले नाही तर गाठणारच असे वक्तव्य खा. छ. उदयनराजे भोसले यांनी केले.

छ. उदयनराजे भोसले यांनी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी भेट घेतली. यावेळी सुनिल काटकर उपस्थित होते. तेव्हा त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

माझ्यावर फाॅर्म काढून घेण्यासाठी दडपण 

जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीतून मी फाॅर्म काढून घ्यावे यासाठी माझ्यावर खूप दडपण येत आहे. त्यामुळे संरक्षण मिळावे, याकरिता मी राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांची भेट घेतल्याचे छ. उदयनराजे भोसले यांनी सांगताच मोठा हस्या पिकला. यावेळी छ. उदयनराजे यांनी चेष्टेचा विषय सोडा, दिपावलीच्या शुभेच्छा देण्यासाठी भेटल्याचे स्पष्ट केले.

 

Leave a Comment