हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विराट कोहली (Virat Kohli), रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) … आयपीएल इतिहासातील टॉप ३ खेळाडू… तिन्ही खेळाडू एकमेकांच्या तोलामोलाचे असल्याने ते एकाच कोणत्या तरी संघातून खेळणं शक्यच झालं नाही. पण तुम्हाला जर विचारलं कि या तिन्ही पैकी कोणत्या एका खेळाडूला तुम्ही सांगता ठेवाल ? कोणाला बाहेर काढाल? तर तुमचीही अडचण होईल… मात्र इंग्लंड क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मायकल वॉनने Cricket.com शी संवाद साधताना आपण एकवेळ विराटला संघातून काढेन पण धोनीला नक्कीच खेळवेन असं म्हणत कॅप्टन कुल माहीचे कौतुक केलं आहे. तर रोहित शर्मा हा माझ्या संघातील राखीव खेळाडू असेल असेही मायकल वॉन म्हणाला.
मायकल वॉन (Michael Vaughan) म्हणाला, मला वाटते कि मी महेंद्रसिंघ धोनीला खेळवेन, कारण मला वाटत नाही कि त्याच्यापेक्षा कोणी चांगला खेळाडू नाही. एवढच नव्हे तर एमएस धोनी माझ्या संघाचा कर्णधार असेल असेही वॉनने स्पष्ट केलं. यानंतर जेव्हा मायलक वॉनला रोहित किंवा विराट कोहलीपैकी एकाला विकण्यास सांगितलं तेव्हा त्याने विराटचं नाव घेतलं. मी विराटला कंटाळलो आहे, त्याच्या संघाने अद्याप एकही आयपीएल ट्रॉफी जिंकलेली नाही म्हणून मी त्याच्याऐवजी रोहितची निवड करेन. रोहित शर्माने सहा वेळा आणि एमएसने पाच वेळा विजेतेपद पटकावले आहे. त्यामुळे मी धोनीला खेळवेन, विराटला विकेन आणि रोहित शर्मा माझ्या संघातील राखीव खेळाडू असेल. विराटला विकल्यामुळे मला भरपूर पैसे मिळतील आणि त्यालाही दुसऱ्या संघात जास्तीचे पैसे मिळतील असं मायकल वॉनने सांगितलं.
दरम्यान, विराट कोहली हा २००८ पासून म्हनजेच आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून रॉयल चॅलेंजर बंगळुरू संघाचा भाग आहे. कोहली असा एकमेव खेळाडू आहे जो आत्तापर्यंत एकाच आयपीएल फ्रेंचायजी कडून क्रिकेट खेळला आहे. आयपीएल इतिहासात सर्वाधिक धावा करण्याचा रेकॉर्ड सुद्धा विराटच्या नावावर आहे. मात्र इतकं सगळं करूनही रॉयल चॅलेंजर बंगळुरूच्या संघाला अजून एकदाही आयपीएल ट्रॉफी जिंकण्यात कोहलीला यश मिळालेले नाही. तर दुसरीकडे रोहित शर्मा आणि एमएस धोनी हे आयपीएल इतिहासातील सर्वोत्तम कर्णधार मानले जातात.