IB Recruitment 2024 | इंटेलिजन्स ब्युरोमध्ये नोकरीची मोठी संधी, 660 पदांसाठी भरती चालू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | तुमचे शिक्षण जर दहावी झाले असेल आणि अजूनही तुम्हाला नोकरी मिळालेली नसेल, तर आज आम्ही तुमच्यासाठी नोकरीची एक भन्नाट संधी घेऊन आलेलो आहोत. या भरती अंतर्गत तुम्ही एका चांगल्या पोस्टवर नोकरी करू शकता. ती म्हणजे आता इंटेलिजन्स ब्यूरोने (IB Recruitment 2024) रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर केलेली आहे. आणि या पदांसाठी त्यांनी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज देखील मागविलेले आहे. या पदांसाठी त्यांनी अर्ज प्रक्रिया सुरू केलेली आहे. त्यामुळे आता उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. तुम्ही लवकरात लवकर जाऊन अधिकृत वेबसाईट ला भेट द्या आणि या भरतीचा अर्ज भरा. या भरतीसाठी वयाची अट काय असणार आहे” शिक्षणाची अट काय असणार आहे” याची सविस्तर माहिती आज आपण पाहणार आहोत.

शैक्षणीक पात्रता | IB Recruitment 2024

इंटेलिजन्स ब्युरोमध्ये अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे शिक्षण हे दहावी पास ते पदवी पर्यंत झालेले असणे गरजेचे आहे. केवळ याच उमेदवारांना या भरती अंतर्गत अर्ज करता येणार आहे.

रिक्त पदांची संख्या

या भरती अंतर्गत तब्बल 660 रिक्त जागा भरल्या जाणार आहे. त्यामुळे तुम्ही अजिबात वेळ न घालवता लवकरात लवकर अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अर्ज करा.

रिक्त पदांचा तपशील

  • ACIO-I/Exe : 70पदे
  • ACIO-II/Exe : 136 पदे
  • JIO-I/Exe : 120 पदे
  • JIO-II/Exe : 170 पदे
  • SA/XE : 100 पदे
  • JIO-II/टेक : 8 पदे
  • ACIO-II/सिव्हिल वर्क्स : 3 पदे
  • JIO-I/MT : 22 पदे
  • कन्फेक्शनर-कम-कुक : 10 पदे
  • काळजीवाहू : 5 पदे
  • PA : 5 पदे