Sunday, May 28, 2023

टी-20 वर्ल्ड कप स्पर्धा यूएईसह ‘या’ देशात होणार; ICCकडून तारखा जाहीर!

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बीसीसीआयने टी – 20 वर्ल्ड कप भारताऐवजी यूएईत खेळवण्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला सांगितल्यावर मंगळवारी आयसीसीने या वर्ल्ड कपच्या तारखांबाबत मोठी घोषणा केली. आयसीसी ट्वेंटी-20 वर्ल्ड कप संयुक्त अरब अमिराती आणि ओमान या ठिकाणी १७ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर यादरम्यान होणार आहे. या स्पर्धेच्या आयोजनाचे हक्क बीसीसीआयकडेच राहणार असल्याचेदेखील आयसीसीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

ही स्पर्धा भारतात होणार होती, परंतु कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे स्पर्धा हलवण्यात आली. बीसीसीआयने या निर्णयासाठी आयसीसीकडे २८ जूनपर्यंत मुदत मागितली होती त्यानुसार बीसीसीआयने सोमवारी आपला निर्णय आयसीसीला कळवला. टी – 20 वर्ल्ड कप स्पर्धेचे सामने दुबई इंटरनॅशनल स्टेडियम, शेख जायेद स्टेडियम, अबु धाबी, शाहजाह स्टेडियम आणि ओमान क्रिकेट अकादमी ग्राऊंड या चार स्टेडियमवर होणार आहेत.

यामधूनच चार संघ सुपर १२ साठी पात्र ठरवण्यात येतील. बांगलादेश, श्रीलंका, आयर्लंड, नेदरलँड्स, स्कॉटलंड, नामिबिया, ओमान, पपुआ न्यू गिनी यापैकी चार संघ सुपर १२ मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी खेळणार आहेत. आयसीसी क्रमवारीत अव्वल ८ क्रमांकावर असलेले संघ आधीच सुपर १२साठी पात्र ठरलेले आहेत. सुपर १२मध्ये ३० सामने होतील आणि २४ ऑक्टोबरला या सामन्यांची सुरुवात होणार आहे.