पाण्याप्रमाणे पाकिस्तान सेमी फायनलसाठी देखील भारतावरच अवलंबून

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

लंडन | भारतात उगम पावून पाकिस्तानात जाणाऱ्या नद्या पाकिस्तानची तहान भागवतात. त्याच प्रमाणे पाकिस्तना या विश्वचषकाच्या खेळात भारतावरच अवलंबून असणार आहे. कारण भारताने काल वेस्ट इंडिज संघाला पराभूत करून सेमी फायनल मधील आपली जागा पक्की केली आहे. तर पाकिस्तान ७ गुणांसह साहाव्या स्थानावर आहे. अशा अवस्थेत भारताने जर इथून पुढचे सर्व सामने जिंकले तर पाकिस्तान सेमी फायनल मध्ये दाखल होऊ शकणार आहे.

 

 

भारत हा या वर्षीच्या विश्वचषकात एकमेव अजिंक्य संघ ठरला आहे. भारताने आता पर्यंत ५ पैकी पाच समाने जिंकले आहेत. तर एक सामना पावसामुळे अनिर्णयीत राहिला आहे. भारत पाकिस्तान या दोन्ही देशात एकच सामना झाला तो भारताने जिंकला आहे. तर आता भारताचे बांग्लादेश, श्रीलंका, इंग्लंड या देशासोबत प्रत्येकी एक सामने होणार आहेत. या तिन्ही सामन्यातील सर्व सामने भारताने जिंकले तर पाकिस्तान फायनल मध्ये जाणार आहे. त्यामुळे विश्वचषकाला इथून पुढे वेगळीच रंगत येणार आहे.