टीम इंडियाच्या ‘त्या’ मॅच फिक्सिंग आरोपांवर ICCने दिली ‘हि’ प्रतिक्रिया

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – टीम इंडियाच्या मॅच फिक्सिंगच्या आरोपांवर आयसीसीने महत्वपूर्ण प्रतिक्रिया दिली आहे. भारत-इंग्लंड यांच्यामध्ये 2016 साली झालेली चेन्नईमधील टेस्ट तसेच भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात 2017 साली रांचीमध्ये झालेली टेस्ट या दोन टेस्टमॅचमध्ये फिक्सिंग झाल्याचा आरोप अल जजीराने याने 2018मध्ये केला होता. अल जजीराचा हा दावा आता आयसीसीने फेटाळून लावला आहे.तसेच अल जजीराने सादर केलेले पुरावे विश्वसनीय आणि पर्याप्त नसल्याचे आयसीसीकडून सांगण्यात आले आहे. अल जजीराने तयार केलेल्या डॉक्युमेंट्रीमध्ये इंग्लंडच्या खेळाडूंनी स्पॉट फिक्सिंग केल्याचा दावा केला होता. पण इंग्लंड क्रिकेट बोर्डाकडून हा दावा फेटाळण्यात आला.

अल जजीराने इंग्लंडच नाही तर ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंवर स्पॉट फिक्सिंगचे आरोप लावले आहेत. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने देखील हे आरोप फेटाळले आहेत. आता आयसीसीने या वादावर आपली प्रतिक्रया दिल्यामुळे या वादावर पडदा पडला आहे. अल जजीराने डॉक्युमेंट्रीमध्ये दाखवलेल्या गोष्टी असामान्य होत्या, यानंतर आयसीसीने चार स्वतंत्र अधिकारी आणि क्रिकेट तज्ज्ञांनी याची चौकशी सुरु केली. आयसीसीने या मॅच फिक्सिंगमध्ये सामील असलेल्या पाच जणांची मुलाखत घेतली, पण त्यांना यामध्ये कोणताही पुरावा मिळाला नाही, असे आयसीसीकडून स्पष्ट करण्यात आले.

आम्ही क्रिकेटमधल्या भ्रष्टाचारावरच्या रिपोर्टिंगचे स्वागत करतो. खेळामध्ये अशाप्रकारच्या वर्तनाला अजिबात जागा नाही. पण ज्यांच्याविरुद्ध आरोप करण्यात आले आहेत त्यांच्याविरुद्ध पुरावेसुद्धा मिळाले पाहिजेत. अल जजीराने तयार केलेल्या डॉक्युमेंट्रीमध्ये केलेले दावे असंभव आणि अविश्वसनीय होते. चारही अधिकाऱ्यांना चौकशीमध्येदेखील हेच आढळून आले असे आयसीसीचे जनरल मॅनेजर एलेक्स मार्शल यांनी सांगितले आहे.

Leave a Comment