Sunday, May 28, 2023

आयसीसीने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2021-23साठी जाहीर केली नवीन पॉईंट सिस्टम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयसीसीने बुधवारी जागतिक कसोटी अजिंक्यपद २०२१-२३च्या पर्वासाठी नवीन गुणपद्धत जाहीर केली आहे. तसेच आयसीसीने २०२१-२३चे वेळापत्रकसुद्धा जाहीर केले आहे. इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेला ४ ऑगस्टपासून सुरूवात होणार आहे. याच मालिकेपासून जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वाला सुरुवात होणार आहे. ऑगस्ट 2021 ते जून 2023 या कालावधीत WTC स्पर्धेचे दुसरे पर्व होणार असून यात भारत-इंग्लंड आणि अ‍ॅशेस या दोन मालिका फक्त पाच सामन्यांच्या आहेत.

https://www.instagram.com/p/CRTBLznpNoO/?utm_source=ig_embed&ig_rid=10ecb963-be7b-4639-a7c3-134e8082dec5

ऑस्ट्रेलियाचा संघ पुढील वर्षी भारत दौऱ्यावर आहे. याठिकाणी तो चार सामन्यांची मालिका खेळणार आहे. तसेच याव्यतिरिक्त तीन सामन्यांच्या सात मालिका आणि दोन सामन्यांच्या 13 मालिका खेळवण्यात येणार आहेत. या पर्वाची फायनल कुठे खेळवली जाणार हे आयसीसीने अजून जाहीर केलेले नाही. WTCच्या पहिल्या पर्वाप्रमाणे कसोटी खेळणारे नऊ संघ तीन होम व तीन अवे अशा सहा मालिका खेळणार आहेत. या कालावधीत इंग्लंड सर्वाधिक 21 कसोटी सामने खेळणार आहेत. यानंतर भारत19, ऑस्ट्रेलिया 18 आणि दक्षिण आफ्रिका 15 सामने खेळणार आहेत. WTCच्या पहिल्या पर्वातील विजेता न्यूझीलंड फक्त 13 कसोटी सामने खेळणार आहे. तसेच वेस्ट इंडिज आणि श्रीलंका हेसुद्धा 13 सामने खेळणार आहेत. पाकिस्तान 14 तर बांगलादेश 12 सामने खेळणार आहे.

https://www.instagram.com/p/CRS_wthjcBd/?utm_source=ig_embed&ig_rid=96761e61-30a1-40c1-af4c-c6b652fe50a9

कशी असेल नवीन Points System
प्रत्येक संघाला समान कसोटी सामने मिळणार नसल्यामुळे गुणतालिकेतील तफावत टाळण्यासाठी आयसीसीने प्रत्येक सामन्याला समान गुण देण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार प्रत्येक कसोटी विजयाला १२ गुण दिले जाणार आहेत, सामना बरोबरीत सुटल्यास ६-६, तर अनिर्णीत राहिल्यास ४-४ गुण देण्यात येणार आहे. या गुणांसोबतच टक्केवारीसुद्धा ठरली आहे. १२ गुणांला १०० टक्के, ६ गुणांना ५० टक्के आणि ४ गुणांना ३३.३३ टक्के देण्यात येणार आहे. दोन सामन्यांची मालिका २४, तिन सामन्यांची मालिका ३६, चार सामन्याची मालिका ४८ आणि पाच सामन्यांची मालिका ६० गुणांची असणार आहे.