बीसीसीआयला धक्का!! भारतात नव्हे तर आता ‘या’ देशात होणार T-20 वर्ल्डकप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयसीसीने क्रिकेट T-20 विश्वचषक स्पर्धा यूएई आणि ओमान येथे आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे.  भारतातील करोनाची स्थिती पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे. आयसीसीच्या निर्णयामुळे बीसीसीआयला मोठा धक्का बसला आहे.

हे सामने यूएईत होत असले, तरी बीसीसीआयकडून या स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे. १७ ऑक्टोबरपासून वर्ल्डकप टी-२० स्पर्धेला सुरुवात होणार आहे. तर अंतिम सामना १४ नोव्हेंबर रोजी होईल. या स्पर्धेत १६ संघ सहभागी होणार आहेत. अबुधाबी, दुबई आणि शारजामध्ये वर्ल्डकपचे सामने खेळवले जातील.

शेड्यूल कसं असणार?

पहिल्या राऊंडमध्ये 8 संघांदरम्यान 12 सामने खेळविले जातील. यामधून चार संघ सुपर 12 साठी क्वालिफाय करतील. आठमधल्या चार टीम अव्वल 8 रँकिंगमध्ये सामिल होऊन सुपर 12 मध्ये पोहोचतील. (बांगलादेश, आर्यलंड, नेदरलँड, स्कॉटलंड, नामिबिया, ओमान, पापुआ न्यू गिनी)

यानंतर 12 संघात एकूण 30 सामने खेळले जातील. जे सामने 24 ऑक्टोबरपासून सुरु होतील. सुपर 12 दोन विभागांमध्ये (सहा-सहा) विभाजित केल्या जातील. या मॅचेस तीन ठिकाणी होतील. दुबई अबूधाबी आणि शारजाहला मॅचेस खेळविण्याचा नियोजन होतील. यानंतर तीन नॉक आऊट सामने होतील. दोन सेमी फायनल आणि एक फायनल…!