ICC च्या टेस्ट ऑलराउंडर खेळाडूंच्या यादीत बेन स्टोक्स अव्वल स्थानी; टॉप ५ मध्ये ‘हे’ २ भारतीय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दुबई । वेस्ट इंडिजविरूद्धच्या दुसऱ्या कसोटीत धडाकेबाज कामगिरी करणारा इंग्लंड संघाच्या  बेन स्टोक्सला ICCच्या ताज्या क्रमवारीत बढती मिळाली. ICCने ताजी कसोटी क्रमवारी जाहीर केली. त्यात अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत त्याने अव्वल स्थान पटकावले तर फलंदाजांच्या यादीत त्याने तिसरे स्थान पटकावलं आहे .

बेन स्टोक्सने अष्टपैलूंच्या यादीत वेस्ट इंडिजचा कर्णधार जेसन होल्डर याला मागे टाकत अव्वलस्थान पटकावले. तसेच अँड्र्यू फ्लिंटॉफनंतर अष्टपैलूंच्या यादीत अव्वल ठरणारा स्टोक्स पहिलाच इंग्लिश खेळाडू आहे. ही स्टोक्सची कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी आहे. टॉप ५ अष्टपैलूंच्या यादीत भारताचा रविंद्र जाडेजा आणि रविचंद्रन अश्विन हे दोघे अनुक्रमे तिसऱ्या आणि पाचव्या स्थानी आहेत. बेन स्टोक्सने कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीतदेखील मार्नस लाबूशेनला खाली ढकलत तिसरे स्थान पटकावले. आता बेन स्टोक्सच्या पुढे ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ आणि भारताचा विराट कोहली हे २ फलंदाज आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment