ICC U19 World Cup: बांगलादेशला चॅम्पियन बनविण्यात या भारतीय क्रिकेटपटूचेही आहे योगदान…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दक्षिण आफ्रिकेतील आयसीसी अंडर -१९ वर्ल्ड कप २०२० मध्ये बांगलादेशने चॅम्पियन होण्याचे मान संपादन केला आहे. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात बांगलादेशी संघाने जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानले जात असलेल्या भारतीय संघाचा डकवर्थ-लुईस नियमाने ३ गडी राखून पराभव केला. जेव्हा बांगलादेश संघाने अंतिम फेरी गाठली तेव्हा कोणीही त्यांना अधिक गंभीरपणे घेत नव्हते, परंतु अकबर अलीच्या या संघाने खरोखरच चांगली कामगिरी केली आणि भारतीय संघाला केवळ ४७.२ षटकांत १७७ धावाच करता आल्या.नंतर बांगलादेशी फलंदाजांनीही संघर्ष केला आणि भारताच्या आशा नष्ट करीत सामन्यात पुनरागमन केले. मात्र बांगलादेश संघाच्या या विजयात भारताच्या एका माजी दिग्गज खेळाडूनेही आपले योगदान दिले आहे हे आम्ही जर तुम्हाला सांगितले तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. पण होय, त्या दिग्गज फलंदाजाचे नाव आहे, वसीम जाफर. भारतीय संघाकडून खेळणारा जाफर बांगलादेशच्या खेळाडूंसाठी फलंदाजी प्रशिक्षकाच्या भूमिकेत आहे.

बांगलादेश क्रिकेट बोर्डाने गेल्या वर्षी मीरपूर येथील हाय परफॉरमन्स अकादमीमध्ये फलंदाजी प्रशिक्षक म्हणून वसीम जाफरची नियुक्ती केली होती. टेलीग्राफशी बोलताना जाफरने बांगलादेश संघाच्या कामगिरीचे कौतुक केले. कॅप्टन अकबर अलीसह बांगलादेश अंडर 19 संघातील काही खेळाडूंच्या फलंदाजीत वसीम जाफरने मोलाचे योगदान दिले आहे. जाफर म्हणाला, ‘अकबरने बांगलादेश संघाचे उत्तम प्रकारे नेतृत्व केले. अकबरने बांगलादेशच्या अंडर 14 आणि अंडर -16 संघाचे नेतृत्व केले आहे. ते म्हणाले, ‘अकबरशिवाय शहाकत हुसेनसुद्धा माझ्याबरोबर होते. मी यातील बहुतेक खेळाडूंना खूप बारकाईने खेळताना पाहिले आहे. या स्पर्धेत त्यांनी आपल्या खेळाद्वारे बहुतेक संघांना आश्चर्यचकित करण्याचे काम केले.

41 वर्षीय जाफर 31 कसोटी आणि 2 एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताकडून खेळला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये त्याने पाच शतकांच्या मदतीने 1944 धावा (सरासरी 34.10) केल्या आहेत.मूळचा मुंबईत जन्मलेला वसीम अजूनही घरगुती क्रिकेटमध्ये धावा काढत आहे. सध्या तो घरगुती क्रिकेटमध्ये विदर्भ संघाकडून खेळत आहे.
वसीम जाफर म्हणाले की, अंतिम सामन्यातही भारतीय संघाला विजेतेपदाचा दावेदार मानले जात होते परंतु बांगलादेश संघाने भारताचा पराभव केला आणि सर्व अंदाज फेटाळून लावले. जाफरने नाणेफेक जिंकून बांगलादेशचा कर्णधार अकबर अलीच्या प्रथम गोलंदाजीच्या निर्णयाचे कौतुक केले. यशस्‍वी जयस्वालचा महत्वपूर्ण विकेट मिळवल्यानंतर बांगलादेशच्या गोलंदाजीने भारतावर दबाव आणला, असे ते म्हणाले.

Leave a Comment