ICICI Bank ने कोट्यावधी ग्राहकांसाठी इंटरनेट बँकिंगवर सुरु केली इन्स्टंट EMI सर्व्हिस, अशाप्रकारे फायदा घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । खासगी क्षेत्रातील आयसीआयसीआय बँक (ICICI Bank) ने आपल्या ग्राहकांसाठी स्पेशल सुविधा सुरू केली आहे. या सुविधेमध्ये ग्राहकांना इंटरनेट बँकिंग प्लॅटफॉर्मवर (Banking Platform) त्वरित ईएमआय सर्व्हिस मिळेल. “EMI @ इंटरनेट बँकिंग” असे या सुविधेचे नाव आहे. या बँकिंग सुविधेच्या सहाय्याने ग्राहकांना डिजिटल मार्गाने EMI चा लाभ मिळणार आहे. याद्वारे प्री-अप्रूव्ड ग्राहकांच्या पाच लाखांपर्यंतचे हाय व्हॅल्यू ट्रांजेक्शन मासिक हप्त्यांमध्ये देखील सहजपणे ट्रान्सफर केले जाऊ शकतात. चला तर मग याविषयी सविस्तरपणे जाणून घेउयात-

इंटरनेट बँकिंग प्लॅटफॉर्मवर इन्स्टंट ईएमआय सुविधा देणारी ही पहिलीच बँक आहे. यापूर्वी कोणत्याही बँकेने ग्राहकांना ही सुविधा दिलेली नाही. लाइव्ह मिंटच्या बातमीनुसार या फिचरसाठी बँकेने BillDesk आणि Razorpay यांच्याबरोबर भागीदारी केली आहे.

EMI @ इंटरनेट बँकिंग सुविधेचा कसा फायदा घ्यावा –
>> यासाठी, आपण मर्चंट वेबसाइट आणि अ‍ॅपवर प्रॉडक्ट किंवा सर्व्हीस निवडा.
>> यानंतर पेमेंट मोडमधील “ICICI Bank Internet Banking” वर क्लिक करा.
>> तुम्हाला तुमचा यूझर आयडी आणि पासवर्ड टाकावा लागेल.
>> पेमेंट डिटेल्स पेज “Convert to EMI instantly” टॅब करा.
>> पेमेंट टेनर निवडा.
>> रजिस्टर्ड मोबाइल क्रमांकावर OTP एंटर करा आणि आपले पेमेंट दिले जाईल.

बँकेच्या अधिकाऱ्याने माहिती दिली
ही सर्व्हीस सुरू करताना बँकेचे अधिकारी सुदिपिता रॉय म्हणाले, “आमच्या EMI @ इंटरनेट बँकिंगची नवीन सर्व्हीस ग्राहकांना हाय व्हॅल्यू ट्रांजेक्शनसाठी EMI सुविधा देईल. यामुळे ग्राहकांची सोय देखील होईल.” लाइव्हमिंटच्या वृत्तानुसार, ही सर्व्हीस पूर्णपणे डिजिटल आणि वेगवान असेल. “आम्हाला विश्वास आहे की, ही सुविधा आमच्या कोट्यावधी प्री अप्रूव्ड ग्राहकांना त्यांच्या संपर्कांसाठी पूर्णपणे संपर्कविरहित, वेगवान, डिजिटल आणि सुरक्षित मार्गाने खरेदी करण्यास अनुमती देईल.”

या सुविधेचे फायदे-
या सुविधेद्वारे बँकेचे ग्राहक 50 हजार ते 5 लाख रुपयांपर्यंतचे प्रॉडक्ट्स खरेदी करू शकतील. याशिवाय तीन महिन्यांतून, सहा महिन्यांतून, नऊ महिन्यातून 12 महिन्यांपर्यंत EMI साठी कोणताही पर्याय निवडू शकता. त्याशिवाय बँकेच्या इंटरनेट बँकिंग प्लॅटफॉर्मद्वारे पैसे भरताना ग्राहक त्यांचे हाय व्हॅल्यू ट्रांजेक्शन त्वरित आणि डिजीटल पद्धतीने EMI मध्ये ट्रान्सफर करू शकतील.

त्याशिवाय ग्राहक त्यांच्या पसंतीच्या गॅझेटसाठी किंवा विमा प्रीमियमसाठी किंवा आपल्या मुलाच्या शाळेच्या फीसाठी किंवा सुट्टीसाठी देखील ही सुविधा निवडू शकतील.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group