ICICI Bank देत आहे स्वस्तात विमानाने प्रवास करण्याची संधी, 1200 रुपयांपर्यंतची मिळेल सूट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । जर तुम्ही देखील कुठेतरी फिरायला जायचा प्लॅन करत असाल तर आता आयसीआयसीआय बँक आपल्या ग्राहकांसाठी एक खास ऑफर घेऊन आली आहे … या ऑफरमध्ये तुम्हाला विमानाने स्वस्तात प्रवास करण्याची संधी मिळणार आहे. आता ही बँक आपल्या ग्राहकांना डोमेस्टिक फ्लाईट्सवर 10 टक्के सवलत देत आहे. नेट बँकिंगचा वापर करुन आपणही या ऑफरचा लाभ घेऊ शकता. बँकेने ट्वीट करुन याबाबतची माहिती दिली आहे. 29 मार्च 2021 पर्यंत प्रवासी या ऑफरचा लाभ घेऊ शकतात.

तुम्ही यात्रा डॉट कॉमच्या माध्यमातून ICICI NetBanking द्वारे तिकिटे बुक करू शकता. तुम्हाला डोमेस्टिक फ्लाईट्सवर जास्तीत जास्त 1200 रुपयांची सूट मिळेल.

ICICI Bank

मिनिमम ट्रान्सझॅक्शन किती असावा
आपण दर रविवारी आणि सोमवारी या ऑफरचा लाभ घेऊ शकता. ICICI बँक इंटरनेट बँकिंगमध्ये ICICINB वापरणार आहे. याशिवाय या ऑफर अंतर्गत तुमचा मिनिमम ट्रान्सझॅक्शन 3500 रुपये असावा.

या वेबसाइटवरून बुकिंग
माहितीनुसार, या ऑफरद्वारे, युझर केवळ एकदाच बुक करू शकतो. याशिवाय ही ऑफर फक्त कन्फर्म बुकिंगवर लागू होईल. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना बुकिंग करतांना इंटरनेट बँकिंग वापरावे लागेल. www.yatra.com या वेबसाइटवर आयसीआयसीआय बँक इंटरनेट बँकिंगवरील सवलतीचा फायदा ग्राहक घेऊ शकतात.

काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा-
>> बुकिंगच्या वेळी आपल्याला प्रोमो कोड फील्डमध्ये ICICINB सबमिट करावे लागेल.
>> बँकेने शेअर केलेल्या पात्र BIN वर त्वरित सूट लागू आहे.
>> जर कार्डची BIN सीरीज यात्रेत बँकेने दिलेली मॅच जुळत नसेल तर कार्डधारक बँकेशी संपर्क साधू शकतील आणि बँकेला निर्णय घ्यावा लागेल.
>> तसेच रद्द केलेले तिकिट किंवा बुकिंगवर सूट लागू होणार नाही.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment