हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | 1 एप्रिलनंतर अनेक आर्थिक व्यवहारांमध्ये बदल झालेला आहे. अशातच आता ICICI बँकेने पुन्हा एकदा त्यांच्या बल्क FD वरील व्याजात सुधारणा केलेली आहे. ICICI बँक ही देशातील सर्वात मोठे खाजगी क्षेत्रातील बँक आहे. या बँकेने 1 एप्रिलपासून नवीन दर लागू केले होते. परंतु पुन्हा एकदा हे नियम बदलून 9 एप्रिल 2024 पासून त्यांनी FD वरील (ICICI FD Rates) व्याजदरात बदल केलेला आहे. ही बँक 7 दिवसांपासून ते 10 वर्षापर्यंतची बल्ब FD ऑफर करत आहे. ICICI बँक ही 7.75% ते 7% या दराने FD वर व्याज देत आहे. जास्तीत जास्त व्याज FD वर 7.25 टक्के दराने मिळत आहे.
आपण आपल्या भविष्याचा विचार करून काही ना काही गुंतवणूक करून ठेवत असतो. अनेक लोक हे FD मध्ये गुंतवणूक करत असतात. ICICI बँकेत ज्या ग्राहकांची FD आहे त्या ग्राहकांसाठी ही अतिशय महत्त्वाची बातमी असणार आहे. कारण ICICI बँकने त्यांच्या FD च्या (ICICI FD Rates) व्याजात पुन्हा एकदा सुधारणा केलेली आहे. आता आपण या बँकेने त्यांच्या बल्ब एफडीवरील व्याज दारात काय बदल केलेला आहे. किंवा सुधारणा केलेली आहे हे पाहणार आहोत.
ICICI बँकेच्या बल्क FD वरील व्याजदर | ICICI FD Rates
15 दिवस ते 29 दिवसाच्या FD वर ICICI बँक ही सामान्य नागरिकांना 7.75 टक्के दराने व्याज देते. जेष्ठ नागरिकांना देखील 4.75 टक्के दराने व्याजदर देते. त्याचप्रमाणे 30 दिवस ते 45 दिवसांच्या FD वर ही बँक सामान्य नागरिकांना 5.50% दराने आणि ज्येष्ठ नागरिकांना देखील त्याच दराने व्याजदर देते. ही बँक जेष्ठ नागरिकांना आणि सामान्य नागरिकांना सारखाच व्याजदर देत आहे. 46 दिवस ते 60 दिवसाच्या FD वर ICICI बँक ही 5.75 टक्के एवढा व्याजदर देत आहे. त्याचप्रमाणे 61 दिवस ते 90 दिवसाच्या कालावधीसाठी ही बँक FD वर 6 टक्के दराने व्याजदर देत आहे.
ICICI बँक ही त्यांच्या ग्राहकांना 91 दिवस ते 120 दिवसांच्या FDवर (ICICI FD Rates) 6.50% दराने व्याज देत आहे. तर 121 दिवस ते 150 दिवसांच्या कालावधीसाठी 6.50 दरानेच व्याजदर देत आहे. तुम्हाला जर 185 दिवस ते 210 दिवसांसाठी FD करायची असेल, तर ही बँक 6.75 टक्क्यांनी व्याजदर देते. त्याचप्रमाणे 211 ते 270 दिवसांच्या FD वर ICICI बँक ही 6.75 टक्के दराने व्याजदर देते. 271 ते 289 दिवसांच्या FDवर ही बँक 6.85% दराने व्याजदर देते. त्याचप्रमाणे तुम्हाला 1 वर्ष ते 389 दिवसांसाठीही FD करायची असे,M तर त्यासाठी ही बँक 7.25 टक्के दराने व्याजदर देते. 390 दिवस ते 15 महिन्यांपेक्षा कमी कालावधीसाठी FD करायची असेल तर ही बँक 7.25 टक्के एवढे व्याजदर देते.
त्याचप्रमाणे 15 महिने ते 18 महिन्यांपेक्षा कमी कालावधीसाठी जर तुम्हाला ICICI बँकेत FD करायची असेल, तर ही बँक सामान्य नागरिकांना 7.5% एवढे व्याजदर देते. 2 वर्ष ते 3 वर्षासाठी ही बँक FDवर 7 टक्के दराने व्याज देते. त्याचप्रमाणे 4 वर्ष ते 5 वर्ष या कालावधीसाठी FD करायची असल्यावर ही बँक 7 टक्के दराने व्याजदर देते. त्याचप्रमाणे 5 वर्षे ते 10 वर्षे करायची असल्यावर देखील ही बँक 7 टक्के दराने व्याजदर देत आहे.