ICSE And ISC Result 2024 | आज म्हणजेच 6 मे रोजी इंडियन सर्टिफिकेट ऑफ सेकंडरी एज्युकेशन दहावी आणि बारावीचे निकाल जाहीर केलेले आहेत. यावर ICSE बोर्डाच्या परीक्षेला बसलेले विद्यार्थी आता अधिकृत वेबसाईटवर जाऊन त्यांचे निकाल पाहू शकता. त्यासाठी तुम्हाला वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
कौन्सिल फॉर इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन (ICSE And ISC Result 2024 ) यांनी ICSE आणि ISC परीक्षा वर्ष 2024 चे निकाल त्यांच्या वेबसाईटवर जाहीर केलेले आहेत. 2695 शाळांपैकी 2223 शाळांमधील विद्यार्थी 100 टक्क्यांनी पास झालेले आहेत. म्हणजे 82.48 टक्के निकाल लागलेला आहे. त्याचप्रमाणे 1366 शाळांपैकी ISC इयत्ता बारावी 2024 च्या परीक्षेसाठी 904 शाळांमधील विद्यार्थी 100% गुणांनी पास झालेले आहेत. म्हणजे त्यांचा निकाल 66.18 टक्के लागलेला आहे. त्याचप्रमाणे ICSE परीक्षांमध्ये मुलींनी बाजी मारलेली आहे. 99.65 टक्क्यांनी मुली पास झालेले आहे, तर 99.31 टक्क्यांनी मुले पास झालेली आहे. त्याचप्रमाणे इयत्ता बारावी मध्ये देखील मुलींनीच बाजी मारलेल्या आहे. आणि मुली 98.92% पास झालेले आहे, तर मुलं 97.53% गुणांनी पास झालेले आहेत..
ICSE दहावी परीक्षा बारावी परीक्षांचे निकाल कसे पाहाल ? | ICSE And ISC Result 2024
यासाठी तुम्हाला ICSE च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल. त्यानंतर होम पेजवर रिझल्टवर क्लिक करा. आणि त्यानंतर निकाल वेबसाईटवर तुम्हाला दिसेल.
त्यानंतर तुमचे लॉगिन पेज उघडेल तुमचा युनिक आयडी, इंडेक्स नंबर आणि कॅपच्या कोड तेथे टाका. त्यानंतर प्रिंट या बटनावर क्लिक करा. आणि तुमचा निकाल स्क्रीनवर देखील दिसेल.