CBSE आणि ICSE बोर्डाच्या दहावी, बारावीच्या परीक्षा रद्द

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील CBSE बोर्डाच्या परीक्षाही रद्द करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर ICSE बोर्डानंही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्राचे सॉलिसीटर जनरल तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयात ही माहिती दिली. CBSE बोर्डान दहावी व बारावीच्या परीक्षा १ ते १५ जुलैदरम्यान घेण्याचे निश्चित केलं होतं. मात्र, कोरोनाच्या परिस्थितीत सुधारणा होत नसल्याच्या पार्श्वभूमीवर परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला.

ऐन परीक्षेच्या काळात देशात कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यानं CBSEच्या परीक्षा लांबणीवर टाकण्यात आल्या होत्या. त्यानंतर सुधारित वेळापत्रकानुसार CBSE बोर्डानं दहावी, बारावीच्या परीक्षा १ ते १५ जुलैदरम्यान घेण्याचे निश्चित केलं होतं. मात्र, देशातील करोना परिस्थितीत सुधारणा होत नसल्यानं या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच विद्यार्थ्यांना मागील ३ वर्गात मिळालेल्या गुणांचं मूल्यमापन करून मूल्यमापन केलं जाणार आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांचं मंडळानं दिलेल्या गुणांवर समाधान होणार नाही, त्यांनी नंतर बोर्डाकडून घेण्यात येणाऱ्या परीक्षा देऊ शकतात. केंद्राचे महाधिवक्ता तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयात ही माहिती दिली.

CBSE बरोबरच ICSE बोर्डानंही दहावी बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयाला दिली. मात्र, बोर्डानं दिलेल्या गुणांवर समाधान झालेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यास बोर्डानं नकार दिला आहे, असंही मेहता म्हणाले. दिल्ली, महाराष्ट्र व तामिळनाडू या राज्यांनी CBSE बोर्डाच्या परीक्षा घेण्यासंदर्भात असमर्थता दर्शविली होती, असं तुषार मेहता यांनी सांगितलं. त्यावर CBSEनं बारावीच्या परीक्षेसंदर्भात नव्यानं सूचना जारी करावी, तसेच राज्य मंडळांच्या परीक्षांच्या स्थितीसंदर्भातही उत्तर दाखल करावे, असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. या याचिकेवर उद्या पुन्हा सुनावणी होणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

Leave a Comment