नवी दिल्ली । भारतीय जीवन विमा महामंडळ (Life Insurance Corporation) नियंत्रित आयडीबीआय बँकेने (IDBI Bank) बुधवारी चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीचा निकाल जाहीर केला. चालू आर्थिक वर्ष 2021-22 च्या एप्रिल ते जूनच्या पहिल्या तिमाहीत बँकेचा निव्वळ नफा चार पट वाढून 603.30 कोटी रुपये झाला आहे.
आयडीबीआय बँकेचा नफा मुख्यत्वे बॅड लोन कमी झाल्यामुळे वाढला आहे. यापूर्वी 2020-21 आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत बँकेला 144.43 कोटी रुपयांचा नफा झाला होता. आयडीबीआय बँकेने शेअर बाजारांना दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, जून 2021 रोजी संपलेल्या तिमाहीत त्याचे एकूण उत्पन्न 6,554.95 कोटी रुपये होते, तर मागील वर्षी याच तिमाहीत ते 5,901.02 कोटी रुपये होते.
NPA मध्ये घट
बँकेच्या मालमत्तेची गुणवत्ता सुधारली आहे. एकूण कर्जाच्या टक्केवारीच्या रूपात नेट NPA घटून 22.71 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे, जो एका वर्षापूर्वी जून 2020 मधील 26.81 टक्के होता. या कालावधीत नेट NPA 1.67 टक्क्यांवर होते, तर मागील वर्षी 2020-21 च्या जूनच्या तिमाहीत ते 3.55 टक्के होते. बँकेची NPA आणि आपत्कालीन तरतुदी जून 2021 रोजी संपलेल्या तिमाहीत वाढून 1,751.80 कोटी रुपये झाली, जी एका वर्षापूर्वीच्या 2020-21 च्या पहिल्या तिमाहीत 888.05 कोटी रुपये होती.
अलीकडेच आयडीबीआय बँकेने FD वरील व्याज दरात बदल केला आहे
अलीकडेच आयडीबीआय बँकेने FD च्या व्याजदरामध्ये काही बदल केले आहेत. 7 दिवस ते 20 वर्षांच्या मुदतीच्या कालावधीसाठी बँकेचे FD वरील व्याज दर 2.7 ते 4.8 टक्क्यांच्या आत आले आहेत. ज्येष्ठ नागरिकांसाठी आयडीबीआय बँक एफडीवरील व्याज दर 3.2% ते 5.3% पर्यंत आहेत. बँक ज्येष्ठ नागरिकांना सर्व कालावधीसाठी अतिरिक्त 50 BPS व्याज दर देते.