आयडिशल एज्युकेशन अॅण्ड सोशल फोरमकडून पाटण तालुक्यातील 50 कुटुंबांना घरगुती साहित्याचा पुरवठा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

आयडिशल एज्युकेशन अॅण्ड सोशल फोरम संचलित मायनाॅरिटी डेव्हलपमेंट सेंटर कराड यांच्यावतीने पूरग्रस्तांना साहित्य पाठविण्यात आले आहे. कोकणातील लोकांना मदत पाठविल्यानंतर आता पाटण तालुक्यातील 50 घरांना घरगुती साहित्यांचा पाठविण्यात आले आहे.

संस्थेचे अध्यक्ष मोहम्मंद डांगे, उपाध्यक्ष इरफान सय्यद सचिव जाकीर शिकलगार, प्रा. पटेल सर, प्रमोद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पूरग्रस्त कुटुंबाना साहित्य वाटपावेळी उमेर शेख, साद पटेल, उमेर पटेल, आत्तो मुजावर, लबिब मुजावर, बिलाल शेख, शफिक शेख, विवेक लोहार आदी उपस्थित होते.

उपाध्यक्ष इरफान सय्यद म्हणाले, नैसर्गिक आपत्तीत कोकण वासियांना पूराचा फटका बसला असल्याने आयडियल एज्युकेशन मदतीचा हात पाठविण्यात आले आहे. मागील एक आठवड्यापासून मदत पाठवत आहोत. पहिल्यांदा पाण्याची व्यवस्था केली. त्यानंतर रेशनिंगचे साहित्य पाठविले. आता पाटण तालुक्यातील आंबेघर, मिरगाव येथील एकूण 50 घरांना आमच्या संस्थेमार्फत घरगुती उपयोगी साहित्य पाठवत आहोत. ज्या- ज्या ठिकाणी अशा मदतीची आवश्यकता आहे, तेथे आम्ही मदत पोहचविण्याचा आमचा निर्धार आहे. समाजातील अनेक लोकांनी यामध्ये हातभार लावलेला आहे.

Leave a Comment