हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (IDFC Bank FD Rate) रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) रेपो दरात वाढ केली आहे. दरम्यान, चलनविषयक धोरण समितीने गेल्या काही बैठकांमध्ये रेपो दर कायम ठेवल्याने त्यात कोणतेही बदल करण्यात आलेले नाही. असे असूनही काही गुंतवणूकदारांसाठी FD मधील गुंतवणूक अत्यंत फायदेशीर ठरली आहे. खास करून IDFC बँकेत FD केलेल्या गुंतवणूकदारांना मोठा फायदा झाला आहे. कारण, खासगी क्षेत्रातील नामांकित बँकांपैकी एक असणाऱ्या IDFC बँकेने फिक्स्ड डिपॉझिटवरील म्हणजेच एफडीवरील व्याजदरात वाढ केली आहे.
IDFC ने नवे व्याजदर केले लागू (IDFC Bank FD Rate)
IDFC बँकेने FD वर पूर्वीपेक्षा जास्त व्याज देण्याची घोषणा केल्यानंतर नुकतेच २१ मार्च २०२४ पासून नवे व्याजदर लागू केले आहेत. व्याजदरात बदल केल्यानंतर IDFC बँकेने आपल्या सर्वसामान्य ग्राहकांना FD तयार करण्यासाठी ३% ते ८% वार्षिक व्याज देणे कबुल केले आहे.
(IDFC Bank FD Rate) यामध्ये सामान्य ग्राहकांपेक्षा ज्येष्ठ नागरिक असलेल्या ग्राहकांना अधिक फायदा होणार आहे. कारण सामान्य ग्राहकांपेक्षा ज्येष्ठ ग्राहकांना ०.५०% इतके अधिक व्याज दिले जात आहे. यानुसार, ज्येष्ठ ग्राहकांना ३.५० ते ८.५०% इतके वार्षिक व्याज देण्यात येत आहे.
कालावधी आणि व्याजदर
IDFC बँकेत ५०० दिवसांच्या कालावधीसोबत FD तयार केल्यास सर्वाधिक व्याज उपलब्ध आहे. मात्र, IDFC बँकेने २ कोटी रुपयांपेक्षा कमी FD असल्यास व्याजदरात काही महत्वाचे बदल केले आहेत. त्यानुसार, ७ ते १४ दिवसांच्या FD वर वार्षिक स्वरूपात ३% दराने व्याज दिले जात आहे. (IDFC Bank FD Rate) तर, १५ ते २९ दिवस आणि ३० ते ४५ दिवसांच्या कालावधीत FD केल्यासदेखील ३% व्याजदर प्रदान केला जाईल. तसेच ४६ ते ९० दिवस आणि ९१ ते १८० दिवसांच्या FD वर ४.५०% व्याजदर दिले जात आहे.
याशिवाय १८१ दिवस ते १ वर्षापेक्षा कमी कालावधीच्या FD वर ५.७५% व्याजदर दिले जात आहे आणि १ वर्षासाठी FD केल्यास ६.५०% व्याजदर प्रदान केले जाईल. तसेच १ वर्ष, १ दिवस ते ४९९ दिवसांची FD केल्यास त्यावर ७.५०% व्याजदर दिला जाईल आणि ५०० दिवसांची FD केल्यास त्यावर सर्वसामान्य ग्राहकांना ८% तर ज्येष्ठ ग्राहकांना ८.५०% इतका व्याजदर दिला जाईल. (IDFC Bank FD Rate)
लक्षात घ्या
IDFC बँकेत FD मधून मिळणारे व्याज हे पूर्णपणे करपात्र असून १ वर्षात यावर जे व्याज तुम्हाला मिळेल ते तुमच्या वार्षिक उत्पन्नात जोडले जाईल. त्यामुळे हे व्याज ‘इतर स्त्रोतांकडून मिळालेले उत्पन्न’ असे मानता येईल. दरम्यान, जर तुमचे उत्पन्न १ वर्षात २.५ लाख रुपयांपेक्षा कमी असेल तर तुमच्या मुदत ठेवींवर TDS कापला जात नाही. (IDFC Bank FD Rate)