हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आज-काल पैशांबाबतचे स्कॅम मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. त्यामुळे आपल्याला कोणत्याही आर्थिक व्यवहार करताना खूप काळजी घ्यावी लागते. विशेषतः एटीएममधून (ATM) पैसे काढताना काळजी घ्यावी लागते. आज एटीएम वापरणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आम्ही घेऊन आलेलो आहोत. खरंतर एटीएम हे असे साधन आह, ज्यामुळे आपल्याला बँकेत न जाता कुठूनही पाहिजे तेव्हा पैसे काढता येतात. अगदी काही मिनिटातच आपण बँकेत न जाता पैसे काढू शकतो.
एटीएम (ATM) मशीनच्या माध्यमातून आपल्याला भारतातील कोणत्याही एटीएममधून पैसे काढता येतात. परंतु अनेकदा आपल्याला एटीएम मधून फाटलेल्या नोटा मिळतात. आणि या नोटा कोणीच घेत नाही. त्यामुळे आपले आर्थिक नुकसान होऊ शकते. आजपर्यंत अनेक लोकांच्या बाबत असे झाले आहे की, एटीएममधून फाटक्या नोटा निघालेल्या आहेत. परंतु त्या नोटांचे पुढे काय करावे? हे त्यांना समजत नाही. आज आम्ही तुम्हाला याबद्दल माहिती देणार आहोत.
ATM मधून फाटलेली नोट निघाल्यास काय करावे?
तुम्ही एटीएममधून पैसे काढले आणि यामध्ये काही नोटा फाटक्या आल्या तर तुम्ही हे या नोटा बदलू शकता. यासाठी तुम्हाला बँकेत जावे लागेल बँकेत गेल्यानंतर फाटलेली नोट तुम्हाला सहज बदलून मिळेल. बँकेमधून तुम्हाला फाटलेल्या नोटांच्या जागी नवीन नोटा दिल्या जातील. याबाबत आरबीआयने काही नियम देखील तयार करून दिलेले आहेत. त्यानुसार एटीएममधून निघालेल्या नोटा जर फाटलेल्या असतील, तर त्या तुम्हाला बँकेत बदलून दिल्या जातील. बँक तुम्हाला या नोटा बदलून देण्यासाठी नकार देऊ शकत नाही. यासाठी तुम्हाला बँकेत जाऊन एक अर्ज करावा लागतो.
किती नोटा बदलू शकता ?
तुम्ही बँकेत गेल्यावर तुम्हाला एक अर्ज भरावा लागेल. या अर्जात तुम्ही पैसे काढल्याची तारीख वेळ आणि ज्या एटीएममधून पैसे काढले आहे त्याची माहिती द्यावी लागेल तुम्ही एका वेळी एक व्यक्ती जास्तीत जास्त 20 नोटा बदलू शकतो. त्याचप्रमाणे या नोटांची किंमत 5000 पेक्षा जास्त नसावी.