सातारा जिल्हा बॅंकेत भाजपा स्वतंत्र लढल्यास राष्ट्रवादीला आव्हान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाला आपली ताकद दाखविण्याची संधी आलेली आहे. यासाठी साताऱ्यातील दोन राजेंची भूमिका महत्त्‍वपूर्ण ठरणार आहे. त्यामुळेच सध्या सर्वसमावेशक असा शब्द वापरला जावू लागला आहे. परंतु भाजपाचे नेते काय निर्णय घेणार यावर भवितव्य अवलंबून असणार आहे. तसेच भाजपने स्वतंत्र लढण्याची भूमिका घेतल्यास राष्ट्रवादीला जिल्हा बॅंकेची निवडणूकीत आव्हान दिले जावू शकते.

आजपर्यंत काॅंग्रेस, राष्ट्रवादीची सत्ता जिल्हा बॅंकेवर अबाधित राहिलेली आहे. परंतु आता राष्ट्रवादीचे छ. उदयनराजे भोसले, आ. शिवेंद्रसिंहराजें भोसले, आ. जयकुमार गोरे, माजी आ. मदन भोसले, माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक- निंबाळकर व डाॅ. अतुल भोसले हे आता भाजपामध्ये आहेत. तेव्हा आता जिल्ह्यातील भाजपाचे नेते व वरिष्ठ नेते काय निर्णय घेणार यावर जिल्हा बॅंकेची निवडणूक सर्वसमावेशक होणार की नाही हे ठरणार आहे. जिल्हा बॅंकेवर बॅंकेच्या विविध मतदारसंघांतील सर्वाधिक मते भाजपचे आमदार व विद्यमान अध्यक्ष शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे आहेत. राष्ट्रवादी आ. शिवेंद्रसिंहराजेंना आपल्यासोबत ठेवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. येत्या तीन ते चार दिवसांत भाजपचे नेते एकत्र बसून जिल्हा बँकेबाबतची भूमिका ठरविणार आहेत. तेव्हा सातारच्या दोन्ही राजांचे मन वळविण्यात भाजपाला यश आले तर राष्ट्रवादीला ही निवडणूक अडचणीची ठरणार आहे.

भाजपाला पहिल्यादाच पक्षाचे अस्तित्व जिल्हा बॅंकेत दाखविण्याची संधी आहे. तर आ. शिवेंद्रसिंहराजे यांना सोबत घेऊन ही निवडणूक सोपी करण्याचा डाव राष्ट्रवादीच्या नेत्यांचा आहे. यावेळेस जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत भाजपला आपली ताकद दाखविण्याची संधी आलेली आहे. भाजपचे नेते राष्ट्रवादीसमोर आव्हान उभे करू शकतात. सध्यातरी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार जयकुमार गोरे, खासदार रणजीत सिंह नाईक व अतुल भोसले या चार जणांनी आपापल्या नावांचे ठराव करून पहिले पाऊल टाकले आहे.

Leave a Comment