पाच दिवसात मागण्या मान्य न झाल्यास रस्त्यावर नागडे आंदोलन – मराठा क्रांती मोर्चा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | मराठा आरक्षणाला न्यायालयाने स्थगिती आणल्या कारणाने मराठा समाजाचा पूर्णपणे उघड्यावर आला आहे. शासनाने मराठा समाजाला उघड्यावर आणले आहे. याच कारणासाठी मंगळवारी 11 वाजता विभागीय आयुक्त कार्यालयासमोर अर्धनग्नावस्थेत आंदोलन करणार असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चा समन्वयक मंगेश साबळे यांनी दिली आहे. 22 तारखेपासून 5 दिवसाची मुदत आम्ही शासनाला देत आहोत आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर अंगावरील सर्व कपडे काढून निर्वस्त्र नागडे आंदोलन करणार असल्याचा इशाराही यावेळी त्यांनी दिला.

मराठा समाजाच्या विविध प्रलंबित मागण्या संदर्भात सोमवारी शहरातील मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक मंगेश साबळे यांच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. यावेळी ते बोलताना ते बोलत होते. उद्यापासून मराठा आरक्षण समन्वय यांच्याकडून अर्धनग्न आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाच्या काही मागण्या आहेत यामध्ये, मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या 42 युवकांना त्वरित 10 लाख व नोकरी देण्यात यावे, मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणासाठी आर्थिक मदतीची तरतूद करण्यात यावी यासारख्या काही मागण्या आंदोलनकर्त्यांनी केल्या आहेत.

पहा व्हिडीओ :

https://twitter.com/AurangabadHello/status/1406943182328262658?s=1005

उद्यापासून आंदोलनाला सुरुवात करण्यात येईल पहिले पाच दिवस हे आंदोलन असणार आहे. अंडरवेअर घालून हे आंदोलन आम्ही करत आहोत. मागण्या पूर्ण केल्या नाही तर आहे ते कपडे उतरवून नग्न अवस्थेत आंदोलन करण्याचा इशारा यावेळी मंगेश साबळे यांनी दिला आहे.

Leave a Comment