नागपूर हादरले ! पत्नी, मुलं, सासू, मेहुणीसह 5 जणांची हत्या करुन पतीची आत्महत्या

नागपूर : हॅलो महाराष्ट्र – नागपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये नागपुरातील पाचपावली परिसरात एकाच कुटुंबातील 5 जणांची हत्या करुन एकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका व्यक्तीने पत्नी, मुलं, सासू आणि मेहुणीची हत्या करुन आत्महत्या केल्याची घटना दुपारी घडली आहे. या हत्याकांडामागचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र, कौटुंबिक वादातून हे हत्याकांड घडलं का? याचा तपास नागपूर पोलिस करत आहेत.

आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव आलोक पातुरकर असे आहे. या व्यक्तीने आधी आपल्या कुटुंबातील पत्नी, मुलं, सासू आणि मेहुणीची हत्या केली आणि त्यानंतर स्वतः आत्महत्या केली आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. दुपारी साडे बाराच्या सुमारास हे हत्याकांड घडले आहे. याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी हे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले.

आलोक पातुरकर हा शिलाई काम करत होता. त्याचा संपूर्ण परिवार प्रमोद भिसीकर यांच्या घरी भाड्याने राहत होता. कौटुंबिक वादातून हे हत्याकांड घडल्याचा पोलिसांकडून अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, केवळ कौटुंबिक वादातून 5 जणांची हत्या आणि स्वत: जीव संपवण्याच्या या प्रकाराचा पोलीस कसून तपास करत आहेत. हि हत्या कौटुंबिक वादातून झाली कि यामागे अजून कोणते कारण आहे याचा तपास नागपूर पोलिसांकडून करण्यात येत आहे.

You might also like