सोलापूर प्रतिनिधी । गेल्या काही दिवसांपासून भाजपामध्ये नाराज असलेल्या नेत्या पंकजा मुंडे यांनी दिवंगत नेते गोपीनाथ मुंडेंच्या यांच्या जयंतीनिमित्त गोपीनाथ गडावर आयोजित कार्यक्रमातून जोरदार शक्तिप्रदर्शन केले होते. यावेळी पंकजा मुंडेंनी मंचावरून थेट नाव न घेता भाजपा नेतृत्वालाच अनपेक्षित जोरदार इशारा दिला होता. त्यामुळे ‘भाजपा’च्या नाराज नेत्यांची बंडखोरी उघड उघड समोर आली होती.
यावर आता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केले आहे. ”आजचं चित्र जरी वेदना देणारा असलं तरी मी गेलो नसतो तर परळीच्या सभेची तीव्रता आणखी वाढली असती” असे वक्तव्य त्यांनी केले आहे. सोलापूर मध्ये आयोजित कार्यकर्त्यांच्या एका मेळाव्यावेळी संवाद साधताना ते बोलत होते. तसेच यावेळी त्यांनी ” बंड आणि भांडण हे आपल्या माणसांविरुद्ध करायचं नसतं. तर आपल्या माणसांसोबत चर्चा करायची असते ”असा सल्ला देखील त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.