चंदेरी दुनिया । सलमानला अनेकजण स्टाईल आयकॉन मानतात. खरं तर बॉलिवूडमध्ये असा एकही कलाकार नाही जो एकदा वापरलेले कपडे पुन्हा घालतो. पण सलमान याला अपवाद आहे. पण तरीही तो तरूणाईसाठी स्टाइल आयकॉन आहे. सलमान अनेकदा एकदा वापरलेला टी शर्ट पुन्हा घालतो. त्यानं काय घातलं आहे याचा त्याला काहीही फरक पडत नाही असं सलमान सांगतो.
सलमान अनेकदा ब्लॅक कलरच्या कपड्यांमध्ये दिसते. काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत त्यानं त्याच्या स्टायलिंग सेन्सवरही गप्पा मारल्या. सलमान म्हणाला, ‘मी अनेक आर्टिकल पाहिलेत ज्यामध्ये महिलांच्या ड्रेसवर सर्कल करून असं सांगितलं जातं की हिने या कार्यक्रमात हे कपडे घातले होते आणि आता हुबेहूब तसाच ड्रेस या कार्यक्रमात घातला आहे.’
सलमान पुढे म्हणाला, ‘जर हे असं ते माझ्यासोबत करू लागले तर हे त्यांना सगळीकडेच करावं लागेल. कारण मी आजही ते शूज वापरतो. जे मी 5 वर्षांपूर्वी घातले होते. त्याच काळ्या टी शर्ट आणि जीन्समध्ये तुम्ही अनेक वर्ष पाहू शकता. माझं एक शर्ट 500 रुपयांचं असतं आणि ते मी अनेक वर्ष वापरतो. यात चुकीच काहीही नाही. माझे बेल्ट सुद्धा 20 वर्ष जुने आहेत. कतरिना काही वर्षांपूर्वी दिलेला बेल्ट मी आजही वापरतो.’