”… तर ती माझी राजकीय आत्महत्या ठरली असती”; अब्दुल सत्तारांचे धक्कादायक विधान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नंदुरबार । ”मी भाजपात प्रवेश केला असता तर ती माझी राजकीय आत्महत्या ठरली असती”, असं महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) म्हणालेत. ते नंदुरबारमध्ये माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. शिवसेना प्रवेशाचे महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी समर्थन केलंय. राजकीय आयुष्यात अनेक राजकीय निर्णय चुकत असतात, तसाच माझा हा निर्णय चुकला असता तर ही माझी राजकीय आत्महत्या ठरली असती, असंसुद्धा अब्दुल सत्तार यांनी अधोरेखित केलेय.

गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांवरही निशाणा साधला होता. चंद्रकांतदादा हिमालयात गेल्यास आम्ही तिकडे त्यांची व्यवस्था करू. इतकेच नव्हे तर मोदी साहेबांनाही हिमालयाची खूप माहिती आहे. त्यामुळे आता चंद्रकांतदादांनी खरंच हिमालयात जायला हवे, असे अब्दुल सत्तार म्हणाले होते.

काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील?
चंद्रकांतदादा यांनी कोल्हापूर ऐवजी पुण्यातील कोथरुडमधून विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढली होती. मात्र, तो विषय त्यांच्यासाठी नेहमीच अडचणीचा ठरला आहे. विरोधकांकडून या मुद्द्यावर चंद्रकांत पाटलांना सातत्याने टोमणे मारले जात आहेत. त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिलं होतं. मी आताही कोल्हापुरातून निवडणूक लढवायला तयार आहे. मी जर कोल्हापूरमधून निवडून आलो नाही, तर हिमालयात जाईन, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले होते.

‘शरद पवार राहुल गांधींविषयी असं बोलले नसतील’
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राहुल गांधी यांच्यात सातत्य नसल्याची टिप्पणी केली होती. त्यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात प्रचंड चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी ट्विट करून महाविकासआघाडीला इशारा दिला होता. हे सरकार स्थिर राहावे असे वाटत असेल कर काँग्रेसच्या शीर्ष नेतृत्वावर टीका-टिप्पणी करणे टाळावे. आघाडी धर्माचं पालन सर्वांनी कराव, असे यशोमती ठाकूर यांनी म्हटले होते. यावर अब्दुल सत्तार यांनी सावध प्रतिक्रिया दिली होती. शरद पवार हे राहुल गांधींविषयी तसं बोलले नसतील. पण तिन्ही पक्षांनी समन्वय टिकवून ठेवणे आवश्यक असल्याचे अब्दुल सत्तार यांनी सांगितले होते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment