DND वर नोंदणी करूनही कंपनी एसएमएस आणि कॉल करत असेल तर कंपनीला होणार मोठा दंड!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली | मोबाईल कंपन्यांचे मेसेज आणि वारंवार येणाऱ्या कॉलमुळे खूप डिस्टर्ब होते. हे मेसेज आणि कॉल नको असतील तर, डीएनडी म्हणजेच, ‘डू नॉट डीस्टर्ब’या सुविधामध्ये कंपनीकडे नोंदणी करावी लागते. ही नोंदणी केल्यानंतर कंपनी आपल्याला नको असलेले कॉल आणि मेसेज करत नाही, असे कंपनी म्हणते. पण तरीही काही कंपन्या पुन्हा कॉल आणि एसएमएस चालू ठेवतात. आता परत – परत ग्राहकांना कॉल करणे कंपनीला महागात पडणार आहे. मोबाइल कंपनीला यामुळे मोठा दंड होणार असल्याची माहिती, केंद्रीय दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनी दिली.

मोबाईल कंपनीकडून त्रास देण्याच्या पद्धतीमध्ये व्यावसायिक संदेश आणि कॉल समाविष्ट आहे. तसेच दूरसंचार संसाधने, आर्थिक फसवणूक करण्यासाठी आणि सामान्य माणसाच्या कष्टाचे पैसे असं करण्यासाठी वापरले जात आहेत. दूरसंचार अधिकाऱ्यांना अशा प्रकारची कामे आणि कृती रोखण्यासाठी ठळक आदेश देण्यात आले आहेत. दूरसंचार अधिकाऱ्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, डू नॉट डिस्टर्ब’ म्हणजे डीएनडी सेवेतील नोंदणीकृत ग्राहकांना मिळत असलेल्या आरटीएम आणि युटीएममार्फत मिळणाऱ्या फोन कॉल आणि एसएमएसची माहिती गोळा करण्याचे काम सध्या सुरू आहे. ती माहिती मिळाल्यानंतर योग्य ती कारवाई करण्याची सुरुवात केली जाईल.

दूरसंचारमंत्री रविशंकर प्रसाद यांनी दूरसंचार कंपन्या, दूरसंचार विक्रेत्यांसह अधिकाऱ्यांना या विषयाची गंभीरपणे जाणीव करून दिली जावी या स्पष्ट सूचना दिल्या आहेत. तसेच, यासंदर्भात करून दिलेल्या नियम आणि कार्यपद्धतीची पूर्तता करण्यात यावी. यामध्ये जर कोणतेही उल्लंघन झाल्यास आर्थिक दंड आकारला जावा असेही आदेश दूरसंचार मंत्र्यांनी दिले आहेत. जमतारा आणि मेवात या क्षेत्रामध्ये वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांबाबतही रविशंकर प्रसाद यांनी चिंता व्यक्त केली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment