.. तर सचिनने 1 लाखांहून अधिक धावा केल्या असत्या – शोएब अख्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने डीआरएस पद्धतीवर भाष्य करत सचिन तेंडुलकर बाबत मोठं विधान केलं आहे. आता तीन रिव्यू सिस्टीम आहेत. सचिन तेंडुलकर जर आजच्या युगात क्रिकेट खेळत असता तर त्याने 1 लाखांहून अधिक धावा केल्या असत्या असे शोएब अख्तरने म्हंटल

शोएब अख्तर म्हणाला, सध्याच्या नियमांचा फायदा फक्त फलंदाजांना होत आहे. “तुम्ही आता एकदिवसीय क्रिकेटमध्ये दोन नवीन चेंडूंसह खेळता. त्यातच आता आता तीन रिव्ह्यूचा नियमही ठेवण्यात आला आहे. सचिन तेंडुलकरच्या काळात हाच नियम असता तर त्याने एक लाखाहून अधिक धावा केल्या असत्या. सचिनने त्याच्या काळात कठीण गोलंदाज खेळले आहेत असेही त्याने म्हंटल

शोएब म्हणाला, “मला सचिनची खरोखर दया येते, तो सुरुवातीला वसीम अक्रम आणि वकार युनिसविरुद्ध खेळला, तो शेन वॉर्नविरुद्ध खेळला, त्यानंतर त्याचा सामना ब्रेट ली आणि शोएब अख्तरशी झाला. यानंतर तो वेगवान गोलंदाजांच्या पुढच्या पिढीतही खेळला. म्हणूनच मी त्याला खूप चांगला फलंदाज मानतो.” सचिनच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 शतके आहेत. त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 18 हजार आणि कसोटी क्रिकेटमध्ये 15 हजारांहून अधिक धावा केल्या आहेत.