जर तुमचेही Central Bank मध्ये खाते असेल तर तुम्हाला 4 लाखांच्या ‘या’ फायद्यासह 2 लाखांचा लाभ फ्रीमध्ये मिळेल

0
42
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । सेंट्रल बँक ऑफ इंडिया आपल्या ग्राहकांना अनेक फायदे देत आहे. असे अनेक ग्राहक आहेत ज्यांना त्यांच्याबद्दल माहिती नसेल. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, 2 लाखांच्या मोफत फायद्यासह वार्षिक फक्त 342 रुपये भरून तुम्ही 4 लाख रुपयांचा अतिरिक्त लाभ कसा मिळवू शकता. चला तर मग बँकेच्या या योजनेबद्दल सर्वकाही जाणून घेऊयात…

2 लाखांचा फायदा फ्रीमध्ये कसा मिळवायचा ते जाणून घ्या
बँकेने ही सुविधा जन धन ग्राहकांना दिली आहे. बँक ग्राहकांना 2 लाख रुपयांपर्यंतच्या अपघाती विमा संरक्षणाची सुविधा पुरवत आहे.

4 लाखांच्या फायद्यासाठी काय करावे ते जाणून घ्या
4 लाख रुपयांचा लाभ मिळवण्यासाठी तुम्हाला सरकारच्या दोन योजनांमध्ये गुंतवणूक करावी लागेल. या योजना प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY) आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY) आहेत. या योजनांमधील गुंतवणुकीची रक्कम खूप कमी आहे.

PMJJBY ला फक्त 330 रुपयांच्या वार्षिक हप्त्यावर मिळेल 2 लाखांचा लाभ
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेसाठी (PMJJBY) वार्षिक प्रीमियम 330 रुपये आहे. या योजनेअंतर्गत व्यक्तीला लाइफ कव्हर मिळते. विमाधारक व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला 2 लाख रुपये मिळतात. ही रक्कम तुमच्या बँक खात्यातून ECS द्वारे घेतली जाते.

पंतप्रधान सुरक्षा विमा योजना
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY) योजना अत्यंत कमी प्रीमियमवर जीवन विमा देते. PMSBY ही केंद्र सरकारची एक योजना आहे, ज्या अंतर्गत खातेधारकाला फक्त 12 रुपयांमध्ये 2 लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळते.

अटल पेन्शन योजना
कमी गुंतवणुकीवर पेन्शनच्या हमीसाठी केंद्र सरकारने अटल पेन्शन योजना सुरू केली आहे. अटल पेन्शन योजनेअंतर्गत सरकार दरमहा 1000 ते 5000 रुपयांच्या पेन्शनची हमी देते. सरकारच्या या योजनेमध्ये, 40 वर्षांपर्यंतची व्यक्ती अर्ज करू शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here