Wednesday, October 5, 2022

Buy now

जर तुम्हीही PNB चे ग्राहक असाल तर ‘या’ खात्यावर मिळतो आहे 20 लाखांचा फायदा, जाणून घ्या कसे?

नवी दिल्ली । जर तुम्हीही पंजाब नॅशनल बँकेत हे खाते उघडले असल्यास तुम्हाला संपूर्ण 23 लाख रुपयांचा लाभ मिळेल. जर तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्ही हे खाते लगेच बँकेत उघडू शकता. या खात्याचे नाव PNB My Salary Account असे आहे. यामध्ये बँकेकडून ग्राहकांना अनेक प्रकारच्या सुविधा दिल्या जातात. या खात्याबद्दल तपशीलवार जाणून घेउयात.

PNB ‘या’ सुविधा पुरवणार आहे
PNB नुसार तुमचा पगार अधिक चांगल्या प्रकारे व्यवस्थापित करू इच्छिता? तर PNB MySalary खाते उघडा. यासोबतच पर्सनल ऍक्सिडेंटल इन्शुरन्स बरोबरच ओव्हरड्राफ्ट आणि स्वीप सुविधेचाही लाभ मिळणार आहे.

जाणून घ्या 20 लाखांचा फायदा कसा मिळेल ?
PNB आपल्या पगार खातेधारकांना इन्शुरन्स कव्हरसह अनेक फायदे देत आहे. झिरो बॅलन्स आणि झिरो क्वार्टलरी ऍव्हरेज बॅलन्स सुविधेसह PNB MySalary खाते उघडल्यानंतर ग्राहकाला रु. 20 लाखांचे पर्सनल ऍक्सिडेंटल कव्हर दिले जात आहे.

‘या’ खात्याच्या 4 कॅटेगिरी
>> या खात्यात 10 हजार ते 25 हजार प्रति महिना पगार सिल्व्हर कॅटेगिरीत ठेवण्यात आला आहे.
>> याशिवाय 2500 ते 75000 पर्यंत असलेल्यांना गोल्ड कॅटेगिरीत ठेवण्यात आले आहे.
>> 75001 रुपये ते 150000 पर्यंत प्रीमियम कॅटेगिरीत ठेवण्यात आले आहे.
>> त्याचवेळी 150001 रुपयांपेक्षा जास्त पगार असणाऱ्यांना प्लॅटिनम कॅटेगिरीत ठेवण्यात आले आहे.

3 लाखांचा लाभ कसा मिळेल ?
बँकेकडून ग्राहकांना ओव्हरड्राफ्टची सुविधा दिली जाते. सिल्व्हर कॅटेगिरीतील लोकांना 50,000 रुपयांपर्यंत ओव्हरड्राफ्टची सुविधा मिळेल. याशिवाय गोल्ड कॅटेगिरीसाठी 150000, प्रीमियम कॅटेगिरीसाठी 225000 आणि प्लॅटिनम कॅटेगिरीसाठी 300000 ओव्हरड्राफ्टची सुविधा मिळणार आहे.

‘या’ लिंकला भेट द्या
अधिक माहितीसाठी तुम्ही https://www.pnbindia.in/salary saving products.html या लिंकला भेट देऊ शकता.