बँक ऑफ बडोदा देत आहे स्वस्तात घर खरेदी करण्याची संधी, अशा प्रकारे करा रजिस्‍ट्रेशन

नवी दिल्ली । जर तुम्ही स्वस्तात घर, दुकान किंवा जमीन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ बडोदा (BoB) ने एक उत्तम ऑफर आणली आहे. तुम्ही बँकेद्वारे होणाऱ्या मेगा ई-लिलावात बोली लावू शकता.

बँक ऑफ बडोदा 19 एप्रिल रोजी हा लिलाव आयोजित करेल, ज्यासाठीची नोंदणी आधीच सुरू झाली आहे. या लिलावाअंतर्गत फ्लॅट, घरे, ऑफिसेस, प्‍लॉट आणि इंडस्ट्रियल प्रॉपर्टीसाठी बोली मागविण्यात येणार आहेत. यामध्ये सहभागी होणारे खरेदीदार त्यांच्या गरजेनुसार सर्वोत्तम प्रॉपर्टीजसाठी बोली लावू शकतात.

बँक कमी व्याजावर कर्जही देईल
BoB ने ट्विट करून या लिलावाबाबतची माहिती देताना सांगितले आहे की,” प्रॉपर्टी किंवा घर खरेदी करण्यास इच्छुक असलेल्या बोलीदारांना परवडणाऱ्या दरात कर्जाची सुविधा देखील मिळेल.” बँकेने आपल्या ट्विटमध्ये असेही म्हटले आहे की,”आता तुम्ही रिअल इस्टेटमध्ये सहज गुंतवणूक करू शकाल तसेच या मेगा लिलावाद्वारे तुमच्या स्वप्नातील घर खरेदी करू शकाल. जर तुम्हाला पैशांची गरज असेल तर स्वस्त दरात कर्ज देखील मिळेल.”

मालमत्तेचा लिलाव का होत आहे?
वास्तविक, बँकेकडून कर्ज घेणारे अनेक ग्राहक विविध कारणांमुळे त्यांचे व्याज आणि मुद्दल भरू शकत नाहीत. अशा परिस्थितीत बँक संबंधित ग्राहकांकडून कर्ज वसूल करण्यासाठी त्यांच्या प्रॉपर्टीजचा लिलाव करते. या लिलावापूर्वी बँका कर्ज फेडण्यास असमर्थ असलेल्या ग्राहकांची जमीन, घर, दुकान किंवा इतर प्रॉपर्टी ताब्यात घेते आणि कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर त्याचा लिलाव करून पैसे गोळा करतात.

येथे रजिस्ट्रेशन करा आणि प्रॉपर्टी पहा
तुम्हालाही BoB च्या या मेगा लिलावाचा भाग व्हायचे असेल आणि घर खरेदीसाठी बोली लावायची असेल, तर तुम्ही बँकेच्या अधिकृत लिंक http://bit.ly/MegaEAuctionApril वर जाऊन नोंदणी करू शकता. यासह, तुम्हाला येथे होणाऱ्या सर्व लिलावांची माहिती देखील मिळेल. याशिवाय, लिलावात समाविष्ट करावयाची प्रॉपर्टी कोणत्या शहराची आणि ठिकाणाची माहिती देखील मिळवू शकता. या प्रकरणात, तुम्हाला तुमच्या आवडीच्या शहरात बोली लावण्याची संधी मिळेल.