सोन्याचे दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर थांबा! ‘या’ नियमांबाबत होऊ शकतो मोठा निर्णय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोन्यासंदर्भात हॉलमार्क च्या नियमांची अंतिम मुदत वाढविण्याची मागणी सराफांनी केली आहे. सोन्याच्या शुद्धतेसाठी भारतात ३ स्टॅण्डर्ड पर्याय पुरेसे नसून कोरोनामुळे झालेल्या नुकसानाच्या भरपाईचा विचार करून देखील पुढच्या वर्षीपर्यंत हॉलमार्किंग ची अंतिम मुदत वाढविण्याची मागणी केली जात आहे. १५ जानेवारी २०२१ पासून देशभरात दागिने आणि आर्टिफॅक्टस च्या सोन्याच्या शुद्धतेसाठी हॉलमार्किंग अनिवार्य केली जाणार आहे. तोपर्यंत सराफाना हॉलमार्किंग सिस्टीम स्वीकारण्यास सांगण्यात आले आहे. तोपर्यंत त्यांनी ब्युरो ऑफ सॅन्डर्ड मध्ये रेजिस्ट्रेशन करवून घेण्यास सांगण्यात आले आहे.

हे तीन हॉलमार्क १४, १८,२२ कॅरेट चे असणार आहेत. जर या नियमांचे पालन केले गेले नाही तर सराफाना दंडासहीत तुरुंगवास देखील होऊ शकतो. संचारबंदीमुळे सराफाना तीन महीने नुकसान सहन करावे लागले आहे. पुन्हा पूर्वस्थितीत येण्यासाठी आणखी ३-४ महिने लागू शकतात. त्यामुळे त्यांच्याकडे हॉलमार्क नसणारा एखादा दागिना शिल्लक राहण्याची शक्यता आहे. सराफांच्या मतानुसार पुढचे सहा महिने देखील त्यांच्याजवळचा स्टॉक संपवायला त्यांना पुरणार नाहीत. म्हणूनच ते हॉलमार्किंग सेवा देण्याच्या मुदतीला वाढविण्याच्या निर्णयासोबत आहेत.

सध्या जास्त हॉलमार्क स्टॅण्डर्ड ची गरज नसल्याचे देखील सराफांचे म्हणणे आहे. त्यामुळे दागिने कसे मिळतील हे सांगता येणार नाही. सोन्याची शुद्धता प्रमाणित करण्याला हॉलमार्क करणे म्हणतात. या प्रमाणित सोन्यावर बीआयएस चे चिन्ह असते. देशभरात साधारण ९०० हॉलमार्किंग सेंटर आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment