कोरोनाच्या उपचारासाठी ‘या’ स्किममधून पैसे काढत असाल तर ‘हे’ नियम जाणुन घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणाने आधीपासूनच कोविड -१९ संबंधित खर्चासाठी एनपीएस खातेधारकांना अंशतः पैसे काढण्याची परवानगी दिली होती. यामध्ये नॅशनल पेन्शन सिस्टम (एनपीएस) ग्राहक आपल्या साथीदाराच्या, मुलांच्या आणि पालकांच्या उपचारासाठी अंशतः पैसे काढू शकतात. आता पीएफआरडीएने सर्व नोडल कार्यालयांना अर्धे पैसे काढण्यासाठी अर्ज केलेल्या अर्जामधील कागदपत्रांची स्कॅन केलेली आणि सेल्‍फ-सर्टिफाइड केली इमेज स्वीकारण्याचे आदेश दिलेले आहेत.

नोडल अधिकारी आवश्यक कागदपत्रांची डिजिटल कॉपी स्वीकारतील
पीएफआरडीएने नुकत्याच जाहीर केलेल्या एका परिपत्रकात म्हटले आहे की, सध्याच्या कोविड -१९च्या संकटकाळात ग्राहकांच्या अंशतः किंवा संपूर्ण पैसे काढण्यासाठी कागदपत्रे जमा करणे शक्य नाही. म्हणून, नोडल ऑफिसेस ही कागदपत्रे डिजिटल स्वरूपात स्वीकारतील. या परिपत्रकानुसार, ग्राहक त्यांच्या रजिस्‍टर्ड ई-मेल आईडीसह पैसे काढण्यासाठी आपला अर्ज पाठवू शकतात. मंजुरी मिळण्यापूर्वी आवश्यक असलेलं फॉर्म आणि कागदपत्रांची तपासणी करण्यासाठी नोडल अधिकारी जबाबदार असतील. पैसे काढण्यासाठीचे नियम आहे तसेच राहतील. पैसे काढण्यासाठीचा फॉर्म भरून आणि आवश्यक कागदपत्रेघेऊन ग्राहक थेट नोडल अधिकाऱ्यांकडेही जाऊ शकतात.

केवळ ३० जूनपर्यंतच डिजिटल मोडद्वारे अर्ज घेतले जातील
पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणाने असे म्हटले आहे की, डिजिटल स्वरूपात पैसे काढण्यासाथीच्या फॉर्मची स्वीकृती आणि पैसे काढण्याची अंतिम तारीख ३० जून २०२० पर्यंतच आहे. नोडल अधिकारी ३१ जुलै २०२० पर्यंत संबंधित सीआरएपर्यंत पोहोचू शकतात. ही व्यवस्था आता अपवाद म्हणून वापरली जाईल असे प्राधिकरणाने म्हटले आहे. यामुळे फॉर्म भरण्याच्या प्रक्रियेस गती देखील मिळेल आणि लोकांना स्वतः कार्यालयात जावे लागणार नाही. तसेच याद्वारे संसर्ग होण्याचा कोणताही धोका नाही. एनपीएस ही एक सरकारी सेवानिवृत्ती बचत योजना आहे, जी केंद्र सरकारने १ जानेवारी २००४ रोजी सुरू केली होती. यानंतर ही योजना खासगी क्षेत्रासाठी २००९ पासून सुरु केली गेली.

एनपीएसमधून अंशतः पैसे काढण्यासाठीचे काय नियम आहेत?

>> एनपीएस ग्राहक आपले एनपीएस खाते सुरू केल्यापासून तीन वर्षानंतर अंशतः पैसे काढू शकतात.

>> उच्च शिक्षण / मुलांचे लग्न, घर खरेदी / बांधकाम आणि गंभीर आजाराच्या उपचारांमध्ये होणार्‍या खर्चासाठी एनपीएसमधून अंशतः पैसे काढले जाऊ शकतात.

>> कोणत्याही मोठ्या गरजेसाठी एनपीएस खात्यातून फक्त तीन पट पैसेच काढले जाऊ शकतात. आपण आपल्या खात्यातून केवळ ३ वेळा मॅक्युरिटीपर्यंतच पैसे काढू शकतात.

>> ग्राहकांनी दिलेल्या अर्ज करण्याच्या तारखेस जास्तीत जास्त २५ टक्केच पैसे काढण्यासाठी परवानगी आहे.

>> एनएसपीचे सदस्य अंशतः पैसे काढण्यासाठी ऑनलाईनदेखील अर्ज करू शकतात. याव्यतिरिक्त, ग्राहक अंशतः पैसे काढण्याच्या फॉर्मसह, पॉईंट ऑफ प्रेझेंटेंस सर्व्हिस प्रोव्हाईडर (पीओपी) कडे आपली कागदपत्रे सबमिट करू शकतात, ज्याच्या आधारे पीओपी ऑनलाइन प्रक्रिया सुरू करू शकतात.

>> पीएफआरडीएने म्हटले आहे की कोरोना विषाणूच्या उपचारांसाठी अंशतः पैसे काढण्याच्या बाबतीत, नोडल ऑफिस / पीओपी / अ‍ॅग्रीग्रेटर हे सुनिश्चित करतील की ग्राहकाने वैद्यकीय प्रमाणपत्र आणि अंशतः पैसे काढण्यासाठीची औपचारिक विनंती केली आहे कि नाही.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment