‘या’ 5 गोष्टी कॅशद्वारे केल्यास घरी येणार इनकम टॅक्स नोटीस ! त्याविषयीचा नियम जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । इनकम टॅक्स डिपार्टमेंट सध्या कॅश ट्रान्सझॅक्शनबाबत अत्यंत सावध झाला आहे. गेल्या काही वर्षांत, इनकम टॅक्स डिपार्टमेंटने बँका, म्युच्युअल फंड हाऊसेस, ब्रोकर प्लॅटफॉर्म इत्यादीसारख्या विविध इव्हेस्टमेन्ट प्लॅटफॉर्मवर सामान्य लोकांसाठी कॅश ट्रान्सझॅक्शनचे नियम कडक केले आहेत.

असे अनेक ट्रान्सझॅक्शन आहेत, जे इनकम टॅक्स डिपार्टमेंटच्या नजरेत आले आहेत. जर तुम्ही बँका, म्युच्युअल फंड, ब्रोकरेज हाऊस आणि प्रॉपर्टी रजिस्ट्रार यांच्यासोबत मोठे कॅश ट्रान्सझॅक्शन करत असाल तर त्याची माहिती इनकम टॅक्स डिपार्टमेंटला द्यावी लागेल. चला तर मग अशाच 5 कॅश ट्रान्सझॅक्शनबद्दल जाणून घेऊयात, जे तुम्हाला अडचणीत टाकू शकतात.

1 बँक फिक्स्ड डिपॉझिट (FD):
तुम्ही एका वर्षात किंवा एकापेक्षा जास्त वेळा FD मध्ये 10 लाख किंवा त्याहून जास्त रक्कम जमा केल्यास, इनकम टॅक्स डिपार्टमेंट तुम्हाला पैशाच्या स्रोताबद्दल विचारू शकते. अशा परिस्थितीत, शक्य असल्यास, बहुतेक पैसे FD मध्ये ऑनलाइन माध्यमातून किंवा चेकद्वारे जमा करा.

2 बँक सेव्हिंग अकाउंट डिपॉझिट :
जर एखाद्या व्यक्तीने एका आर्थिक वर्षात एका खात्यात 10 लाख रुपये किंवा त्याहून जास्त कॅश किंवा एकापेक्षा जास्त खात्यात जमा केले, तर इनकम टॅक्स डिपार्टमेंट पैशाच्या स्त्रोताविषयी प्रश्न विचारू शकते. करंट अकाउंटमध्ये जास्तीची मर्यादा 50 लाख रुपये आहे.

3 क्रेडिट कार्ड बिल पेमेंट
अनेक वेळा लोक क्रेडिट कार्डचे बिलही कॅशने जमा करतात. जर तुम्ही एका वेळी 1 लाख रुपयांपेक्षा जास्त कॅश क्रेडिट कार्ड बिल म्हणून जमा केले तर इनकम टॅक्स डिपार्टमेंट तुमची चौकशी करू शकतो. दुसरीकडे, जरी तुम्ही एका आर्थिक वर्षात 10 लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेचे क्रेडिट कार्ड बिल कॅशने भरले तरीही तुम्हाला पैशाच्या स्रोताबद्दल विचारले जाऊ शकते.

4 प्रॉपर्टी ट्रान्सझॅक्शन
तुम्ही प्रॉपर्टी रजिस्ट्रारकडे कॅशने मोठा ट्रान्सझॅक्शन केल्यास त्याचा रिपोर्टही इनकम टॅक्स डिपार्टमेंटकडे जातो. तुम्ही 30 लाख किंवा त्याहून जास्त किमतीची कोणतीही प्रॉपर्टी कॅशने खरेदी केली किंवा विकली, तर त्याची माहिती प्रॉपर्टी रजिस्ट्रारच्या वतीने इनकम टॅक्स डिपार्टमेंटकडे जाईल.

5 शेअर्स, म्युच्युअल फंड, डिबेंचर्स आणि बाँड्सची खरेदी
जर तुम्ही शेअर्स, म्युच्युअल फंड, डिबेंचर्स आणि बाँड्समध्ये मोठ्या प्रमाणात कॅश ट्रान्सझॅक्शन करत असाल तर तुम्हाला समस्यांना सामोरे जावे लागू शकते. एका आर्थिक वर्षात अशा इंस्ट्रुमेंट्समध्ये जास्तीत जास्त 10 लाख रुपयांपर्यंतचे कॅश ट्रान्सझॅक्शन केले जाऊ शकतात. त्यामुळे यापैकी कोणत्याहीमध्ये पैसे गुंतवण्याची तुमची योजना असेल तर पहिली गोष्ट लक्षात ठेवा की, तुम्हाला मोठ्या प्रमाणात कॅश वापरण्याची गरज नाही.

Leave a Comment