हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात मागील काही दिवसांपासून “ड्रंक अँड ड्राईव्ह”च्या (Drank And Drive) घटना वाढलेल्या आहेत. पुण्यातील पोर्शे कार अपघात, आणि त्यानंतर मद्यधुंद चालकाने २ पोलिसाना सुद्धा उडवले. त्यातच मुंबईत सुद्धा वरळीमध्ये असाच काही प्रकार पाहायला मिळाला. ड्रंक अँड ड्राईव्हमुळे अनेकांना आपल्या जवळच्या लोकांना गमवावे लागलं आहे. या सर्व घटनांनी देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी (Pune Police) एक मोठा निर्णय घेतला आहे. इथून पुढे दारू पिऊन गाडी चालवल्यास लायसन्स रद्द करण्यात येईल. पुणे पोलिसांनी याबाबत न्यायालयात प्रस्ताव टाकला आहे.
पुण्यात गेल्या ६ महिन्यात १६८४ जणांवर ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यावर आळा घालण्यासाठीच पोलिसांकडून कठोर पावलं उचलायला सुरुवात झाली आहे. यापूर्वी दारू पिऊन वाहन चालवणे यांच्यावर फक्त खटले पाठवून त्यांच्यावर कारवाई केली जात होती. आता मात्र थेट लायसन्स रद्द करण्यात येणार आहे. इथून पुढे जर कोणी चालक पहिल्यांदा दारू पिऊन गाडी चालवताना आढळला तर त्याचे ड्रायव्हिंग लायसन्स ३ महिने रद्द केले जाईल, त्याच व्यक्तीने जर पुन्हा गुन्हा केला तर ६ महिन्यापर्यंत त्याचा परवाना रद्द होणार मात्र तिसऱ्या वेळीस पुन्हा तीच व्यक्ती आढळून आली तेव्हा मात्र त्याचे ड्रायव्हिंग लायसन्स कायमस्वरूपी रद्द होणार आहे.
दरम्यान, काही महिन्यापासून ड्रंक अँड ड्राइव्हच्या घटना सतत पाहायला मिळत आहेत. यात बहुतांश वेळा बड्या व्यक्तीचा समावेश दिसतोय. पुण्यातील बहुचर्चित कल्याणीनगर कार अपघात प्रकरणाने देशात एकच संताप उसळला होता. धक्कादायक बाब म्हणजे आरोपीला वाचविण्यासाठी सर्वच यंत्रणा कामाला लागल्याचे सुरुवातीला दिसून आले होते. अगदी अशीच एक घटना मुंबईतील वरळीमध्येही समोर आली आहे.. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. या सर्व घटनांना आला घालण्यासाठीच आता लायसन रद्द करण्याचा निर्णय पुणे पोलिसांनी घेतला आहे. सध्या तरी न्यायालयात हा प्रस्ताव टाकन्यात आला असून न्यायालय याबाबत काय निर्णय घेत ते पाहायला हवं. तसेच या नव्या नियमामुळे ड्रंक अँड ड्राइव्हच्या प्रकारात घट होते का? ते पाहायला हवं.