हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन -|आधार कार्ड हे सगळ्यात महत्वाचे कागदपत्र आहे. आजकाल सगळीकडे आधारकार्डची गरज पडते. सगळ्या शासकीय कार्यालयामध्ये आधार कार्डची गरज पडते. यामुळे आपल्या आधार कार्डचा कोणी गैरवापर करू नये म्हणून ते लॉक करण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. यासाठी तुम्ही UIDAI च्या संकेतस्थाळावर जाऊन आपले आधार कार्ड लॉक करू शकता. एकदा का तुमचे आधार कार्ड लॉक झाले तर तुमच्या माहितीचा गैरवापर कुणीही करू शकणार नाही.
आपले आधार कार्ड लॉक करण्याची प्रक्रिया पुढीलप्रमाणे :
१ सर्वप्रथम UIDAIच्या https://resident.uidai.gov.in/ या अधिकृत संकेतस्थाळावर जा.
२ तेथे असलेल्या ‘My Aadhaar’ नावाच्या पर्यायामध्ये ‘Aadhaar Services’ या पर्यायावर क्लिक करा.
३ Aadhaar Services’ मध्ये खालच्या बाजूला Lock/Unlock Biometrics हा पर्याय दिसेल.
४. तिकडच्या बॉक्सवर क्लिक करून Lock/Unlock Biometrics सिलेक्ट करा.
५. तिकडे क्लिक केल्यावर तुम्हाला log in चा पर्याय दिसेल. तिथे तुमचा १२ अंकी आधार क्रमांक किंवा १५ अंकी व्हर्चुअल आयडी टाका.
६ त्यानंतर खाली येणारा कॅप्चा कोड टाका आणि ‘Send OTP’ या पर्यायावर क्लिक करा.
७ ‘Send OTP’ केल्यावर तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी येईल. तो ओटीपी टाकल्यावर तुम्हाला बायोमेट्रिय डेटाला लॉक करण्याचा पर्याय दिसेल.
८ तुम्ही लॉक करण्याचा पर्याय निवडल्यावर तुमचे आधार कार्ड ब्लॉक होईल.
हि संपूर्ण प्रक्रिया करताना लॉक हा पर्याय स्वीकारण्यापूर्वी न विसरता १६ अंक व्हर्चुअल आयडी तेथील पर्यायावरून तयार करा. कारण तुमचे आधार कार्ड लॉक झाल्याने त्याच्याशी संबंधित KYC किंवा अन्य कोणत्याही कागदपत्रासाठी तुम्हाला या व्हर्चुअल आयडीचा उपयोग होईल. आधार कार्ड जसे लॉक करता येते तसेच ते अनलॉक देखील करता येते.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा
Click Here to Join Our WhatsApp Group