कोकणात 31 डिसेंबरला निघालात तर थांबा : “या” मार्गावरील घाट राहणार दोन दिवस बंद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड |  कराड- चिपळूण- गुहागर या मार्गावर कुंभार्ली घाटात जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी दरडी कोसळणे, रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. त्यामुळे वारंवार कुंभार्ली घाटात वाहतूक कोंडी होत आहे. तेव्हा पुढील दोन दिवस दि. 30 व 31 डिसेंबर रोजी कुंभार्ली घाट वाहतूकीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याचे पत्र सार्वजनिक बांधकाम विभाग चिपळून यांनी दिले आहे. त्यामुळे कोकणात 31 डिसेंबरचे सेलिब्रेशन करणाऱ्या पर्यटकांना कराड- चिपळूण- गुहागर बंद राहणार आहे.

उपरोक्त विषयानुसार दि. 21 व 22 जुलै 2021 या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमध्ये गुहागर चिपळूण कराड रस्ता रामा 136 या रस्त्यावर कुंभार्ली घाटामध्ये काही ठिकाणी खड्डे पडले आहेत. सोनपात्रा या वळणाच्या ठिकाणी पावसाळयामध्ये वारंवार काळया खडीने खड्डे भरण्याचे काम करणेत आलेले आहे. तसेच दोन वेळा सदर ठिकाणी कॉक्रीटीकरण करणेत आलेले आहे. परंतु अतिवृष्टीमुळे व काम करताना अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे कॉक्रीटीकरण पूर्णपणे निघुन गेलेले आहे.

पश्चिम महाराष्ट्राकडे जाणारे काही रस्ते वाहतुकीस बंद असल्यामुळे या रस्त्यावरून जड वाहनांची मोठया प्रमाणात वाहतुक सुरु आहे त्यामुळे खड्यांमध्ये मोठया प्रमाणात वाढ होत आहे. पावसाळयामध्ये सोनपात्रा या ठिकाणी किरकोळ अपघात होऊन वारंवार वाहतुक खंडीत होत होती. दि. 27.11.2021 रोजी सोनपात्रा या ठिकाणी अवजड वाहतुक करणारा ट्रक बंद पडल्याने काही काळ वाहतुक खंडीत झालेली होती. तदनंतर या कार्यालयाकडून दि. 28.11.2021 रोजी डांबरीकरणाचे पॅचवर्क करणेत आले. परंतु अवजड वाहनांमुळे सर्व पंचवर्क उखडल्याचे दि. 29.11.2021 रोजी पहाणी दरम्यान निदर्शनास आलेले आहे. सबब सद्य:स्थितीत घाट भागातील डांबरीकरणाचे काम करताना अवजड वाहतुक बंद करण्यांत यावी असे या कार्यालयाचे मत आहे. तरी आपले स्तरावरुन दि. 30.12.2021 ते 31.12.2021 पर्यंत गुहागर चिपळूण कराड रस्त्यावरील पोफळी नाका ते कुंभालों घाटमाथा पर्यंतची वाहतूक बंद करणेबाबत आदेश पारीत होणेस विनंती आहे.

Leave a Comment