निवडणुकीत तिकिट पाहिजे तर 10 झाडे लावा : रामराजे नाईक- निंबाळकर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा | जागतीक पर्यावरण दिनानिमीत्त फलटण मध्ये 1000 झाडं लावून पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रत्येक व्यक्तीने 10 झाडं लावली पाहिजेत, अन्यथा निवडणुकीचं तिकीट मिळणार नाही. तेव्हा तिकिट पाहिजे त्यांनी 10 झाडं लावून दाखवावीत किंवा आमच्याकडे आणून द्यावीत, असा फतवाच विधानपरिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी काढला.

फलणट येथे या उपक्रमाचा शुभारंभ विधानपरिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते वृक्षारोपण करुन करण्यात आला. या कार्यक्रमात वनविभाग सातारा, मुधोजी महाविद्यालय फलटण तसेच आम्ही निसर्ग सोबती या संस्थांनी सहभाग घेतला. या कार्यक्रमास जिल्हापरिषदेचे अध्यक्ष संजीवराजे निंबाळकर, आमदार दिपक चव्हाण, उपवनसंरक्षक महादेव मोहीते तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी निसर्गासाठी मोलाचा हातभार लावून लावलेली झाडे जगवण्यासाठी कायम प्रयत्न करण्याचा निश्चय करुन फलटण तालुक्यातील जावली गावात 15 लाख झाडं लावण्याचा संकल्प देखील करण्यात आला.

यावेळी माध्यमांशी बोलताना रामराजे नाईक- निंबाळकर म्हणाले, पर्यावरण आणि झाडांच महत्व लोकांना सांगितलं पाहिजे. अभिनेत्यांनी या चळवळीत आलं पाहिजे त्यांच्या येण्यामुळं तरुण यात सहभागी होतील आणि झाडं लावण्याची चळवळ निर्माण होईल. तसंच भोंगे लावायचं का नाही लावायचं हा वाद करण्यापेक्षा झाडं लावलेली परवडतील.

Leave a Comment