नवी दिल्ली । जर तुम्ही तुमच्या चांगल्या भविष्यासाठी गुंतवणुकीचे प्लॅनिंग करत असाल तर तुमच्यासाठी LIC ची एक उत्तम योजना आहे. भारतीय आयुर्विमा महामंडळाने (LIC) 1 जुलै 2021 रोजी एक नवीन योजना सुरू केली आहे. देशातील सर्वात मोठी विमा कंपनी LIC ने सरल पेन्शन योजना (Saral Pension scheme) लाँच केली आहे.
LIC सरल पेन्शन योजना ही नॉन-लिंक्ड, सिंगल प्रीमियम, वैयक्तिक तात्काळ वार्षिकी योजना आहे. ही योजना जोडीदारासोबतही घेता येईल. या योजनेमध्ये, पॉलिसी सुरू झाल्याच्या तारखेपासून सहा महिन्यांनंतर कधीही कर्ज मिळू शकते. हे ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने उपलब्ध आहे.
सरल पेन्शन योजना घेण्याचे 2 मार्ग
सिंगल लाइफ – यामध्ये पॉलिसी कोणत्याही एकाच्या नावाने असेल, म्हणजेच ही पेन्शन योजना कोणत्याही एका व्यक्तीशी जोडली जाईल. जोपर्यंत पेन्शनधारक जिवंत आहेत, तोपर्यंत त्यांना पेन्शन मिळत राहील. त्यानंतर नॉमिनी व्यक्तीला बेस प्रीमियम मिळेल.
जॉईंट लाइफ- या योजनेत पती-पत्नी दोघांनाही कव्हरेज असेल. यामध्ये जो दीर्घकाळ जिवंत राहतो, त्याला पेन्शन मिळते. जेव्हा दोघेही नसतील, तेव्हा नॉमिनी व्यक्तीला बेस प्राइस मिळेल.
तुम्हाला किती गुंतवणूक करावी लागेल?
या योजनेअंतर्गत, जर तुम्हाला मासिक पेन्शनचा लाभ घ्यायचा असेल, तर दरमहा किमान 1 हजार रुपये जमा करावे लागतील. त्याचप्रमाणे त्रैमासिक पेन्शनसाठी एका महिन्यात किमान 3 हजार गुंतवावे लागतील.
सरल पेन्शन योजनेची वैशिष्ट्ये
>> विमाधारकासाठी पॉलिसी घेताच त्यांची पेन्शन सुरू होईल.
>> आता हे तुमच्यावर अवलंबून असेल की, तुम्हाला दरमहा किंवा तिमाहीत, अर्धवार्षिक किंवा वार्षिक पेन्शन हवी आहे. तुम्हाला हा पर्याय स्वतः निवडावा लागेल.
>> ही पेन्शन योजना ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही प्रकारे घेता येते.
>> या योजनेमध्ये किमान 12000 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. यामध्ये गुंतवणुकीची कमाल मर्यादा नाही.
>> ही योजना 40 ते 80 वर्षांच्या लोकांसाठी आहे.
>> या योजनेत, पॉलिसीधारकाला पॉलिसी सुरू झाल्याच्या तारखेपासून 6 महिन्यानंतर कधीही कर्ज मिळेल.