आता सुई न टोचता मिळणार इंजेक्शन; संशोधकांनी तयार केली वेदनारहित सिरिंज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत इंजेक्शनचे नाव घेतले की, त्यांना खूप भीती वाटते. कारण इंजेक्शन दिल्यानंतर काही वेळ त्या ठिकाणी वेदना होत असतात. परंतु आता इथून पुढे तुम्हाला घाबरण्याची काहीही गरज नाही. कारण आता वेदना रहित इंजेक्शन तुम्हाला दिले जाणार नाही. कारण मुंबई आयआयटीच्या संशोधकांनी यावर एक मोठा उपाय शोधला आहे. त्यांनी शॉकवेव्ह नावाची एक नवीन सिरींज विकसित केलेली आहे. यामुळे तुम्हाला इंजेक्शन देताना कोणत्याही प्रकारच्या वेदना होणार नाही.

या सिरींजच्या मदतीने शरीरावर दाब देऊन इंजेक्शन देता येते. यामुळे तुम्हाला वेदना देखील होत नाही. आणि कोणताही संसर्ग होण्याचा धोका देखील कमी असतो. अशा प्रकारची माहिती संशोधकांनी दिलेली आहे. डॉक्टर मानवी शरीरात औषधे पोहचवण्यासाठी इंजेक्शनचा वापर करतात. पण सुईची अनेकांना भीती वाटते. तसेच लहान मुलांना देखील इंजेक्शन देणे खूप कठीण होते. त्याचप्रमाणे अनेक वेळा काही डॉक्टर एक इंजेक्शन अनेक वेळा वापरतात. त्यामुळे संसर्गाचा धोका मोठा प्रमाणात असतो. परंतु आता याचे कोणत्याही प्रकारची टेन्शन राहणार नाही.

आयआयटी मुंबईच्या एरोस्पेस अभियांत्रिकी विभागाचे प्राधिकृत विरेन मेनेजेस यांच्या नेतृत्वाखाली संशोधकांच्या शॉक सिरिंज वापरून शरीरात जाण्याचे नवीन तंत्रज्ञान विकसित केलेले आहे. यामध्ये दिलेल्या औषधांनी प्रयोगशाळेतील उंदरावर इंजेक्शनच्या सुईने दिलेल्या औषधांची तुलना केलेली आहे. आपण ज्यावेळी इंजेक्शन छोट्या प्रमाणात छिद्र करते. परंतु शॉक सीरींजमध्ये असे काहीही होणार नाही. त्याऐवजी आता ध्वनी लहरीद्वारे वेगाने प्रवास करतात.

यामध्ये प्रेशराईज नायट्रोजन वायू औषधाने भरलेल्या शॉक सीरींजवर दाब लागू करून द्रव्य औषधाच्या बारीक स्प्रे तयार करतो. हा स्प्रे वेगाने त्वचेत जातो. आणि संपूर्ण प्रक्रिया त्या व्यक्तीला समजण्याआधीच पूर्ण.होते.. हे 2019 मध्ये तयार केलेले आहे. यामध्ये सूक्ष्म शॉक ट्यूब आहेत.