अवैध दारू : वडूजमध्ये दोन ठिकाणी कारवाई, 5 लाखांचा मुद्देमाल जप्त

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा | बेकायदेशीर दारू वाहतूक व विक्री प्रकरणी पोलिसांनी सापळा लावून वाहतूक करणाऱ्या चारचाकी वाहनांसह मुद्देमाल जप्त केला आहे. दोन ठिकाणी केलेल्या कारवाईत एकूण 4 लाख 93 हजार 2300 रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किरण दत्तात्रय जाधव (रा. वडूज) हा बेकायदेशीर देशी दारूची वाहतूक करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सातेवाडी कॉर्नर याठिकाणी खासगी वाहनातून जावून सापळा लावला. त्याठिकाणी बेकायदेशीपणे दारूची वाहतूक करणाऱ्या वाहनाचा चालक अजित सुखदेव बुरुंगले (रा. गणेशवाडी, ता. खटाव) याच्या ताब्यातून ६३ हजार ३६० रुपये किमतीचे देशी दारूचे २२ बॉक्स, चार लाख रुपये किमतीचे एक पांढऱ्या रंगाचे चारचाकी वाहन असा एकूण ४ लाख ६३ हजार ३६० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. या वेळी बुरुंगले याच्यासमवेत असलेला किरण जाधव हा अंधाराचा फायदा घेऊन फरारी झाला.

किरण जाधव याच्या घराच्या आडोशाला दारू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी जाधव याच्या घराजवळ छापा टाकून त्या ठिकाणाहून १४ हजार ४०० रुपये किमतीचे देशी दारूचे ५ बॉक्स व १५ हजार ४७० रुपयांची रोख रक्कम असा २९ हजार ८७० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. दोन्ही घटनांत पोलिसांनी एकूण ४ लाख ९३ हजार २३० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. सहायक पोलिस निरीक्षक मालोजीराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. अधिक तपास राहुल सरतापे, रेखा खाडे करीत आहेत.

Leave a Comment